आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहित असताना 17 वर्षांनी लहान अभिनेत्यासोबत होते जॅकी श्रॉफच्या पत्नीचे अफेअर!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगा टायगर आणि मुलगी कृष्णासोबत आयशा श्रॉफ, इनसेटमध्ये साहिल खानसोबत आयशा श्रॉफ - Divya Marathi
मुलगा टायगर आणि मुलगी कृष्णासोबत आयशा श्रॉफ, इनसेटमध्ये साहिल खानसोबत आयशा श्रॉफ

मुंबईः अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी 1 फेब्रुवारी रोजी वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत. जॅकी यांचे खरे नाव जय किशन काकूभाई आहे. गुजराती कुटुंबात जन्मलेल्या जॅकी दादांनी हिंदीसह प्रादेशिक भाषेत सुमारे 200 चित्रपटांमध्ये काम केले आहे. जॅकी यांची पत्नी आयशा श्रॉफसुद्धा चित्रपटांमध्ये झळकल्याचे बहुतेक जणांना ठाऊक नसावे. आता मात्र आयशा चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. 'ग्रहण' (2001) या सिनेमात आयशा शेवटची झळकली होती.  


17 वर्षांनी लहान अॅक्टरसोबत होते आयशा श्रॉफचे अफेअर...
- 57 वर्षीय आयशाचे नाव 40 वर्षीय बॉलिवूड अभिनेता साहिल खानसोबत जुळले होते.
- विवाहित आयशा आणि साहिलचे अफेअर बरेच गाजले होते. स्वतः साहिलने आयशा श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती.
- आयशाने मात्र ही गोष्ट नाकारली होती.


आयशाने साहिल म्हटले होते 'गे'...
- साहिलने आयशासोबतच्या अफेअरची सार्वजनिकरित्या कबुली देऊन म्हटले होते, की आता आमचे ब्रेकअप झाले आहे. त्यामुळे आयशाने त्याला दिलेले महागडे गिफ्ट्स आणि हॉलिडेजवर केलेल्या खर्चाचे पैसे परत मागितले आहेत.
- साहिलच्या या दाव्याचे खंडन करून आयशाने त्याला 'गे' म्हटले होते. 
- साहिल एक 'समलैंगिक पुरुष आहे', त्यामुळे त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिल्याचे आयशाने म्हटले होते.
- आयशाच्या सांगण्यानुसार, साहिलच्या पत्नीने त्याला एका व्यक्तीसोबत आपत्तीजनक अवस्थेत पाहिले होते.


आयशाने साहिलवर लावला होता फसवणुकीचा आरोप...
- आयशा आणि साहिल जुने मित्र होते.
- आयशाचा आरोप होता, की 2009 साली तिने साहिलसोबत सायबर सिक्युरिटी कंपनी आणि एक प्रॉडक्शन हाऊस सुरु केले होते.
- ही सायबर सिक्युरिटी कंपनी लवकच बंद पडली, तर प्रॉडक्शन हाऊससुद्धा तोट्यात गेले.
- आयशाने म्हटले होते, की जेव्हा तिने साहिलकडे पैशांचा हिशेब मागितला तेव्हा त्याने तो देण्यास नकार दिला होता.
-  आयशाने साहिलवर 8 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लावला होता. 
- नोव्हेंबर 2014 मध्ये आयशाने साहिलविरोधात निनावी नंबरवरुन धमकीवजा फोन केल्याची तक्रार दाखल केली होती.


पुढील स्लाईड्सवर वाचा, आयशा आणि साहिलशी निगडीत आणखी काही गोष्टी आणि बघा PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...