Home »Gossip» Jacqueline Fernandez Rare Modelling Audition Photo

एकेकाळी ऑडिशनसाठी रांगेत उभी दिसली होती जॅकलिन फर्नांडिस, बघा असेच काही PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Feb 10, 2018, 00:47 AM IST

  • 2006 मध्ये दिल्लीत झालेल्या एका फॅशन शोच्या ऑडिशनसाठी रांगेत उभी असलेली जॅकलिन फर्नांडिस (डावीकडून दुस-या स्थानावर)

मुंबईः श्रीलंकन ब्युटी क्वीन आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस जॅकलिन फर्नांडिसचा 'बागी 2' हा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षितच्या तेजाब या गाजलेल्या चित्रपटातील एक दोन तीन... हे गाणे रिक्रिएट करण्यात आले आहे. या गाण्यावर जॅकलिन फर्नांडिस ताल धरणार आहे. 2016 मध्ये आलेल्या 'बागी' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. अमजद खान या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. जॅकलिनसह टायगर श्रॉफ या चित्रपटात मेन लीड साकारतोय. यावर्षी 30 मार्चला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. जॅकलिनने 2009 मध्ये 'अलादीन' या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केले होते. मात्र तिला यश मिळाले ते 'मर्डर 2' या सिनेमातून. आतापर्यंत तिने 'हाउसफुल (तिन्ही पार्ट्स) आणि 'किक', 'जुडवा 2' या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले आहे.


2006 मध्ये पटकावला मिस श्रीलंकाचा किताब...
- जॅकलिन बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच एक मॉडेलसुद्धा आहे.
- 2006 मध्ये तिने मिस श्रीलंका हा किताब आपल्या नावी केला होता.
- 2006 मध्येच तिने लॉस एंजिलिसमध्ये झालेल्या मिस यूनिव्हर्स पीजेंटमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले होते.


या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला जॅकलिनचे मॉडेलिंगच्या काळातील खास फोटोज दाखवत आहोत...

Next Article

Recommended