आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dhadak बघून समोर आली जान्हवी कपूरच्या Ex-बॉयफ्रेंडची रिएक्शन, हार्टचा इमोजी बनवून शेअर केला Photo

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची थोरली मुलगी जान्हवी कपूरचा डेब्यू चित्रपट 'धडक' हा 20 जुलै रोजी रिलीज झाला आहे. मराठीत इतिहास रचलेल्या सैराट या चित्रपटाचा हा हिंद रिमेक आहे. रिलीजपूर्वी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग मुंबईतील यशराज स्टुडिओ येथे बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्स पोहोचले होते. पण सर्वाधिक चर्चेत राहिला तो जान्हवीचा पुर्वाश्रमीचा प्रियकर शिखर पहाडिया. शिखरने जान्हवीचा पहिलावहिला चित्रपट बघितला आणि त्यानंतर सोशल मीडियावर धडकच्या फोटोसोबत हार्ट शेपचे इमोजी बनवून आपली प्रतिक्रिया दिली. 

 

शिखर पहाडियाला किस करतानाचा जान्हवीचा फोटो झाला होता व्हायरल...
दोन वर्षांपूर्वी जान्हवीचा शिखर पहाडियाला किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत दोघांमधील जवळीक स्पष्ट दिसली होती. हा फोटो बघून श्रीदेवी जान्हवीवर नाराज झाल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा हा फोटो व्हायरल झाला, तेव्हापासूनच जान्हवी आणि शिखर यांच्यात दुरावा निर्माण झाला. शिखर हा माजी केंद्रिय मंत्री सुशाल कुमार शिंदे यांचा नातू आहे.


अक्षत रंजनसोबत जुळले आहे जान्हवीचे नाव...

6 मार्च 2018 रोजी जान्हवीच्या 21 व्या वाढदिवसाला जान्हवीचा तथाकथित बॉयफ्रेंड अक्षय रंजनने सोशल मीडियावर रोमँटिक पद्धतीने तिला शुभेच्छा दिल्या होत्या. अक्षतने इंस्टाग्रामवर जान्हवीचा एक फोटो पोस्ट करुन बर्थडे विश केले होते. अक्षतच्या या पोस्टला रिप्लाय देताना जान्हवीने त्याला 'I Love You' म्हटले होते. या कमेंटनंतर यूजर्सनी जान्हवीला अक्षत तुझा बॉयफ्रेंड आहे का.. असा प्रश्न विचारला होता. पण त्यावर तिने उत्तर देणे टाळले होते. 

 

कोण आहे अक्षत रंजन...
अक्षत सध्या बोस्टन, अमेरिकेच्या Tufts University (Massachusetts) येथे उच्च शिक्षण घेत आहे. येथेच जान्हवीचे शिक्षण झाले आहे. 2017 मध्ये जान्हवी, श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यासोबत अक्षत 'डियर जिंदगी'च्या स्क्रिनिंगला दिसला होता. त्यानंतर अक्षत आणि जान्हवीचे नाते कपूर कुटुंबीयांनी स्वीकारले असल्याचे म्हटले गेले होते.  अक्षतची श्रीदेवी यांच्यासोबत चांगली बाँडिंग होती. 

बातम्या आणखी आहेत...