आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Janhvi Kapoor Dhadak Breaks Opening Day Records Of Sonam Kapoor Arjun Kapoor Film

बहीण-भावांना पछाडत पुढे गेली जान्हवी, 'धडक'च्या फर्स्ट डे कमाईने मोडला सोनम, अर्जुन, हर्षवर्धनचा रेकॉर्ड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जान्हवी कपूरचा डेब्यू चित्रपट 'धडक'ला चांगला रिस्पॉन्स मिळतोय. चित्रपटाने पहिल्या दिवशी 8.71 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट धर्मा प्रोडक्शनची निर्मिती आहे. तर शशांक खेतान हे दिग्दर्शक आहेत. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईने जान्हवीने आपले भाऊ-बहिण म्हणजे अर्जुन कपूर, सोनम कपूर आणि हर्षवर्धन कपूरचा रेकॉर्ड मोडला आहे. जान्हवीच्या डेब्यू फिल्मने या तिघांच्या डेब्यू फिल्मच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकले आहे. सध्या जान्हवीकडे दूस-या एखाद्या चित्रपटाची ऑफर नाही. 


सोनम कपूर
सोनमने संजय लीला भन्साळींच्या 'सावरियां'(2007) चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर होता. रणबीर कपूरनेही या चित्रपटातून डेब्यू केला होता. चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 30 लाखांची कमाई केली होती. सोनमच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर तिचा आगामी चित्रपट 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा आहे. 


अर्जुन कपूर 
2012 मध्ये आलेल्या 'इश्कजादे' चित्रपटातून अर्जुनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हबीब फैजल यांनी या चित्रपटाते दिग्दर्शन केले होते. चित्रपटात अर्जुनसोबत परिणीती चोप्रा होती. चित्रपटाने पहिल्या दिवशी 4.54 कोटींचा बिझनेस केला होता. अर्जुनच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर 'नमस्ते इंग्लंड', 'संदीप और पिंकी फरार' आणि 'पानीपत' हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. 

 

हर्षवर्धन कपूर
हर्षवर्धन कपूरने 'मिर्जिया'(2016) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. डायरेक्टर राकेश ओमप्रकाश मेहताच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.20 कोटींची कमाई केली होती. चित्रपटात हर्षवर्धनसोबत सैयामी खेरने स्क्रीन शेअर केली होती. हर्षवर्धन कपूरच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे तर 'अनटाइटल्ड अभिनव बिंद्रा' हा त्याचा आगामी चित्रपट आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...