आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या व्यक्तीने जान्हवीला दिली होती \'आई\'च्या मृत्यूची बातमी, अशी झाली अवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शनिवारी रात्री बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवींचे निधन झाले. त्या फक्त 54 वर्षांच्या होत्या. त्यांच्या अकाली जाण्याने सर्वांनाच धक्का बसलाय. या गोष्टीचा सर्वात मोठा धक्का श्रीदेवीच्या कुटूंबाला बसला आहे. जान्हवी, खुशी आणि बोनी कपूर यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. दुबई येथे लग्नसमारंभासाठी गेलेले असताना ही घटना घडली. यावेळी बोनी कपूर आणि खुशी श्रीदेवीसोबत होते. परंतू मुलगी जान्हवी कपूर त्यांच्यासोबत नव्हत. जान्हवी 'धडक' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये असल्यामुळे ती लग्नाला जाऊ शकली नव्हती. 

 

यांनी सांगितली बातमी
श्रीदेवींच्या मृत्यूची बातमी मीडियामध्ये वा-यासारखी पसरली. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार जान्हवी कपूरला ही बातमी सर्वात पहिले करण जोहरने सांगितली. करण जोहरला श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी कळता तो जान्हवीच्या घरी गेला आणि नंतर तिला अनिल कपूरच्या घरी घेऊन गेला.

 

दुबईला का गेली नव्हती जान्हवी?
'सैराट'चा हिंदी रिमेक 'धडक'ची शूटिंग सध्या सुरु आहे. शूटिंगच्या डेट्स अॅडजस्ट न झाल्यामुळे जान्हवी दुबई येथे लग्नाला गेली नव्हती असे वृत्त आहे. दुबईमध्ये लग्नसमारंभानंतर श्रीदेवीला मृत्यूने गाठले. यावेळी जान्हवी जवळ नव्हती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवी आणि जान्हवीचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

 

बातम्या आणखी आहेत...