आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या निधनाच्या 13 दिवसांनी कामावर परतली जान्हवी, सुरु केली 'धडक'ची शूटिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाच्या 13 दिवसांनी त्यांची लेक जान्हवी कपूरने तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. जान्हवी आगामी 'धडक' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. जान्हवीने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केल्याची माहिती फिल्मफेअरने एका ट्वीटच्या माध्यमातून दिली. फिल्मफेअरने एक फोटो ट्वीट केला असून त्यामध्ये जान्हवी साडीत अतिशय साध्या लूकमध्ये  शूटिंग सेटवर दिसतेय. फोटोसोबत फिल्मफेअरने ट्वीट केले, 'Love and respect!#JanhviKapoor goes back to shoot for her debut film #Dhadak'.

 

'धडक'चे दिग्दर्शक शशांक खैतान यांनी सांगितले, की होय आम्ही आता चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. टीमने ब्रेक घेतल्याची बातमी अफवा आहे. आम्ही मुंबईत शूटिंगला सुरुवात केली असून पुढचे शेड्यूल हे कोलकातामध्ये असेल. रिपोर्ट्सनुसार, जान्हवी आणि ईशान यांच्यावर वांद्रा परिसरात चित्रपटातील काही सीन्स चित्रीत करण्यात आले आहेत. पुढच्या शेड्यूलसाठी जान्हवी आणि ईशान चित्रपटाच्या टीमसोबत कोलकाताला रवाना होतील. धडक हा चित्रपट मराठीतील ब्लॉकबस्टर सैराट या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. करण जोहर या चित्रपटाचा निर्माता असून यावर्षी 6 जुलै रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, जान्हवी आणि ईशानचे काही फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...