आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या लग्नात आईच्या हिट गाण्यांवर डान्स करणार श्रीदेवीची मुलगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड आनंद आहूजासोबत ती 7-8 मेला लग्न करणार आहे. सूत्रांनुसार श्रीदेवीची मुलगी जान्हवी बहिणीच्या लग्नाच्या संगीत सेरेमनीमध्ये फरफॉर्म करणार आहे. जान्हवी आईचे 'चांदनी' चित्रपटातील गाणे 'मेरे हाथो में नौ-नौ चूडिया है...' यावर डान्स करणार आहे. जान्हवी सध्या डान्सची प्रॅक्टिंस करण्यात व्यस्त आहे. 


'चालबाज' च्या गाण्यावरही करणार डान्स...
- जान्हवी फक्त 'चांदनी' च्या गाण्यावरच डान्स करणार नाही तर श्रीदेवीच्या 'चालबाज' चित्रपटातील 'किसी के हाथ ना आएगी ये लडकी...' यावरही परफॉर्म करणार आहे.
- सोनम कपूरच्या जुहू येथील बंगल्यात सध्या संगीत सेरेमनीची तयारी सुरु आहे.
- जान्हवी आगामी चित्रपट 'धडक' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय.
- जुलैमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट मराठी चित्रपट 'सैराट' चा रिमेक आहे.
- धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार केला जाणार आहे.

 

प्रथा-परंपरा महत्त्वाच्या
सोनमने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, 'मी माझ्या लग्नापेक्षा वेडिंग प्लानिंगसाठी एक्सायडेट आहे. लग्नात जास्तीत जास्त पैसा खर्च करण्यापेक्षा लग्नातील प्रथा-परंपरा मला महत्वाच्या वाटतात. सोनम लग्नाचे कार्ड छापनार नाही असे वृत्त आहे. कार्ड न छापण्याचा निर्णय सोनम कपूरने घेतला आहे. सूत्रांनुसार सोनम आणि आनंदला कागद वेस्ट करायचे नाही. यामुळे त्यांनी वेडिंग कार्ड न छापण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांनी ई-इनवाइट तयार केले आहेत. हे सर्वांना पाठवले जातील.'


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जान्हवी-सोनमचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...