आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्याने केला पाकिस्तानी अभिनेत्रीला Kiss करण्याचा प्रयत्न, व्हिडिओ झाला व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. नुकताच लक्स स्टाइल अवॉर्ड सोहळा आयोजित करण्यात आला होता. या इव्हेंटमध्ये माहिराला 'वरना' या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला. ती अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर गेली तेव्हा तिच्यासोबत एक विचित्र घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतोय. माहिरा स्टोजवर अवॉर्ड घेण्यासाठी पोहोचली तेव्हा पाकिस्तानी इंडस्ट्रीचा अभिनेता जावेद शेखही तिथे उपस्थित होता. अवॉर्ड घेतल्यानंतर माहिरा जावेद शेखसोबत हात मिळवण्यासाठी गेली. तेव्हा जावेदने हात मिळवल्यानंतर तिला किस करण्याचा प्रयत्न केला. परंतू माहिराने त्याला असे करु दिले नाही आणि ती इग्नोर करत स्टेजखाली उतरली. 


व्हायरल व्हिडिओमुळे ट्राल झाला जावेद शेख...
जावेद शेखने माहिराला किस करण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. यूजर्सने त्याला ट्रोल करणे सुरु केलेय. हे पाहू माहिराला वाईट वाटले. तिने ट्वीटर करत लिहिले की, 'I have just woken up to such silly stuff floating around. It’s good to be aware and have an opinion but for Gods sake don’t use anything and everything to make news. Javed Sheikh of all people! He is a legend and a mentor to all of us in this industry. Would vouch for him always'.

 

माहिराने 'रईस' या चित्रपटातून शाहरुखसोबत डेब्यू केला होता. तिचे नाव रणबीर कपूरसोबत जोडले गेलेय. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये ती रणबीरसोबत सिगारेट ओढताना दिसली होती. दोघांचा स्मोकिंग करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा माहिराचे काही फोटोज... शेवटच्या स्लाइडवर पाहा तो व्हिडिओ...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...