आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Competition: श्रीदेवीची मुलगी जान्हवी उत्कृष्ट की, सैफची मुलगी सारा? जान्हवीचे उत्तर ऐकून सर्वांनी केले कौतूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: मीडियामध्ये गेल्या काही दिवसांपासून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खानमध्ये स्पर्धा सुरु आहे. अशा वेळी जान्हवी या विषयावर खुलून बोलली आहे. तिने सांगितले की, माझ्या आणि सारामध्ये काहीच स्पर्धा नाही. मी तिचे सर्व चित्रपट अवश्य बघणार आहे. जान्हवीचा डेब्यू चित्रपट 'धडक' 20 जुलैला रिलीज होणार आहे. चित्रपटात तिच्या अपोजिट ईशान खट्टर आहे. 

 

सारा माझ्यापेक्षा उत्कृष्ट
'धडक'च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये जान्हवी म्हणाली की, सारामध्ये माझ्यापेक्षा जास्त पुढे जाण्याची शक्यता असल्याचे मला वाटते. महिलांनी नेहमी एकमेकांना सपोर्ट करायला पाहिजे. जान्हवीच्या अशा बोलल्याने उपस्थित लोक इम्प्रेस झाले. 


'सैराट'चा हिंदी रीमेक आहे 'धडक'
जान्हवी आणि ईशान सध्या 'धडक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट मराठीतील सुपरहिट चित्रपट 'सैराट'चा हिंदी रीमेक आहे. करण जोहर हा चित्रपट प्रोड्यूस करत आहेत. तर शशांक खेतान या चित्रपटाचे डायरेक्टर आहे. 

 

साराही याच वर्षी करणार डेब्यू
सैफ अली खानची मुलगी सारा अली खान याच वर्षी 'केदारनाथ' चित्रपटातून डेब्यू करणार आहे. या चित्रपटात तिच्या अपोजिट सुशांत सिंह राजपूत असणार आहे. हा चित्रपट 28 नोव्हेंबरला रिलीज होऊ शकतो. तर 'सिम्बा' चित्रपटात सारा आणि रणवीर सिंहची जोडी दिसणार आहे. हा चित्रपट याच वर्षी 28 डिसेंबरला रिलीज होऊ शकतो. सारा ही सौफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंहची मुलगी आहे. 

 

करीनाने दिला आपला मेकअप आर्टिस्ट
सावत्र मुलगी सारा अली खानचा लुक बदलण्यासाठी करीना कपूरने आपला मेकअप आर्टिस्ट आणि हेयर स्टायलिस्ट दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार 'केदारनाथ'मध्ये साराची हेयरस्टाइल करीनाला आवडली नाही. अशा वेळी 'सिम्बा' चित्रपटासाठी तिने आपल्या एक्स्पर्ट्सची मदत मागितली. आता 'सिम्बा' चित्रपटात साराचा मेकअप आणि हेअर स्टाइल करीनाचे मेकअप आर्टिस्ट पॉम्पी करणार आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...