आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिलचेअरवर 'धडक' बघण्यासाठी पोहोचली जान्हवीची आजी, असे केले नातीचे कौतूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 20 जुलै रोजी श्रीदेवी यांची थोरली कन्या जान्हवी कपूरचा 'धडक' हा डेब्यू चित्रपट रिलीज झाला. रिलीजपूर्वी या चित्रपटाचे तिसरे स्क्रिनिंग मुंबईत ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला एका खास व्यक्तीने उपस्थिती लावली होती. ही खास व्यक्ती म्हणजे बोनी कपूर यांच्या मातोश्री आणि जान्हवीची आजी निर्मल कपूर होत्या. वृद्धापकाळाने त्यांना चालता येत नाही, त्यामुळे त्या व्हिलचेअरवर बसून आपल्या नातीचा पहिलावहिला चित्रपट बघायला पोहोचल्या होत्या. त्यांना हा चित्रपट एवढा भावला की, चित्रपट बघितल्यानंतर त्यांनी जान्हवीच्या हाताचे चुंबन घेऊन तिचे कौतूक केले. 


सोशल मीडियावर अर्जुन कपूरने केले जान्हवीचे कौतूक... 
- तिस-या स्क्रिनिंगला जान्हवीचा भाऊ अर्जुन कपूरसुद्धा  आवर्जुन हजर होता. चित्रपट बघितल्यानंतर अर्जुनदेखील जान्हवीचे कौतूक करायला विसरला नाही.
- अर्जुनने सोशल मीडियावर लिहिले, "धडक रिलीज झाला आहे. शशांक खेतान यांनी मनाला स्पर्श करुन जाणारी लव्ह स्टोरी बनवली आहे. दोन्ही स्टार्सना त्यांनी पडद्यावर उत्कृष्ट सादर केले आहे." 
- अर्जुनने पुढे लिहिले, "ईशान तू तुझ्या अभिनायतून प्रेमीयुगुलांच्या प्रेमाची पवित्रता दाखवली आहे. तर जान्हवी तू मला निशब्द केले आहे. मला तुझा अभिनमान वाटतो."


पहिल्या स्क्रीनिंग पोहोचले होते कपूर घराणे...
- मुंबईत आतापर्यंत 'धडक'चे तीनदा स्क्रिनिंग झाले आहे. पहिल्या स्क्रिनिंगला जान्हवीचे संपूर्ण कुटुंबीय हजर होते. जान्हवीचे वडील बोनी कपूर, बहीण खुशी कपूर, अनिल कपूर, सुनीता कपूर, संजय कपूर, महीप संधू, सनाया कपूर, मोहित मारवाह, सोनम कपूर, रिया कपूरसह कपूर कुटुंबीयांनी जान्हवीचा पहिला चित्रपट बघितला. 

बातम्या आणखी आहेत...