आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवीने आई श्रीदेवीचे फक्त पाहिले 5 चित्रपट, म्हणाली, \'मला आईची कॉपी व्हायचे नाही\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'सैराट'चा या ब्लॉकबस्टर ठरलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक'मधून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर यांची थोरली कन्या जान्हवी कपूर सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अलीकडेच जान्हवी तिचा सहकलाकार ईशान खट्टरसोबत चंदीगड येथे पोहोचली होती. प्रमोशनदरम्यान जान्हवीने तिची दिवंगत आई श्रीदेवी यांच्या आठवणींना उजाळा दिला. श्रीदेवी यांचे नाव निघताच जान्हवी भावूक झाली. पण स्वतःवर ताबा मिळवत जान्हवी आपल्या आईविषयी भरभरुन बोलली.

 

आई श्रीदेवीचे स्थान जान्हवीच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे आहे. मुलाखतीत जेव्हा जान्हवीला श्रीदेवी यांच्या आवडत्या चित्रपटांविषयी विचारणा झाली, तेव्हा ती म्हणाली, माझ्या आईने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण मी आजवर तिचे केवळ पाचच चित्रपट पाहिले आहेत. यामध्ये मिस्टर इंडिया, रुप की राणी, सदमा, इंग्लिश विंग्लिश आणि मॉम या चित्रपटांचा समावेश आहे. आणखी एका प्रश्नाचे उत्तर देताना जान्हवी म्हणाली, मला माझ्या आईची कॉपी व्हायचे नाही. तर मला तिच्यासारखे व्हायचे आहे. मी आईला बघूनच अभिनय शिकले आहे. त्यामुळे तिचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. 


जान्हवी पुढे म्हणाली, आईने कायम मला लहान बाळासारखेच ट्रीट केले. आता आईची भूमिका खुशी आणि वडील निभावत आहेत. आईने कायम मला पाठिंबा दिला. आईविषयी बोलताना जान्हवीचे डोळे पाणावले होते. जान्हवीचा पहिला वहिला 'धडक' हा चित्रपट येत्या 20 जुलै रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.  

 

पुढील स्लाईड्सवर बघा, चंदीगड येथे प्रमोशनसाठी पोहोचलेल्या जान्हवी आणि ईशानचे निवडक फोटोज..

 

बातम्या आणखी आहेत...