आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जो जिता वही सिकंदर'ला 26 वर्षे पूर्ण, एवढ्या वर्षांत आता अशी दिसते सिनेमातील StarCast

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः मॉडल स्कूल आणि राजपूत स्कूलच्या विद्यार्थ्यांमधील टशन आजही लोकांना आठवतचं असेल ना... आम्ही बोलतोय ते 'जो जिता वही सिकंदर' या सिनेमाविषयी. मन्सूर खान दिग्दर्शित या सिनेमात मॉडल स्कूल आणि राजपूत स्कूलच्या विद्यार्थ्यांमधील शत्रुत्व, आमिर खान आणि आयशा जुल्का यांच्या पात्रात हळूवार फुलत जाणारे प्रेम अतिशय सुंदररित्या पडद्यावर साकारले होते. 22 मे 1992 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाला आज 26 वर्षे पूर्ण झाली आहेत. 

 

त्याकाळात बॉक्स ऑफिसवर प्रेमकथेवर आधारित सिनेमांचा बोलबाला होता. पण जो 'जिता वही सिकंदर' या सिनेमाने तरुणाईमध्ये वेगळीच क्रेझ निर्माण केली. सिनेमातील गाणी प्रचंड गाजली होती. या सिनेमाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. आमिर खान, आयशा जुल्का, पूजा बेदी, दीपक तिजोरी, मामिक सिंह, कुलभूषण खरंबदा यांच्या महत्त्वाच्या भूमिका या सिनेमात होत्या.  

 

'जो जिता वही सिकंदर' हा दिग्दर्शक मन्सूर खान यांचा पहिला सिनेमा असता. पण त्यावेळी या सिनेमाची स्क्रिप्ट तयार नव्हती. म्हणून त्यांनी आधी 'कयामत से कयामत तक' बनवण्याचा निर्णय घेतला. 


आता कशी दिसते सिनेमाची स्टारकास्ट बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...