आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Southचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरने शेअर केला दुस-या बाळाचा फोटो, फॅन्सला सांगितले हे नाव...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई/हैदराबादः साउथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर गेल्या महिन्यात 14 जून रोजी दुस-या मुलाचा बाबा झाला. अलीकडेच त्याच्या मुलाचे बारसे झाले. ज्युनिअर एनटीआरने आपल्या बाळाचा फोटो शेअर करुन लिहिले, ज्युनिअर एनटीआरच्या लिटिल वनचे नाव आहे 'भार्गव राम'. ज्युनिअर एनटीआरचे हे दुसरे अपत्य असून त्याला एक चार वर्षांचा मुलगा आहे. त्याचे नाव अभय राम आहे. 20 मे 1983 रोजी हैदराबादमध्ये जन्मलेला ज्युनियर एनटीआर गतकाळातील अभिनेते आणि आंध्रप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचा नातू आहेत.

 

 2011मध्ये केले होते लक्ष्मी प्रणतीसोबत लग्न...
2010 मध्ये विजयवाडाचे वडील वकील सिंगुलुरी शांती प्रसाद यांनी ज्युनियर एनटीआरविरोधात चाइल्ड मॅरेज अॅक्टअंतर्गत तक्रार दाखल केली होती. ज्युनिअर एनटीवर बिझनेसमन (तेलुगु चॅनलचे मालक) नर्ने श्रीनिवास राव यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी प्रणतीसोबत लग्न करत असल्याचे या वकिलांचे म्हणणे होते. या प्रकरणानंतर प्रणती 18 वर्षांची झाल्यानंतर 5 मे 2011 रोजी दोघांचे लग्न झाले होते.  

 

'बिग बॉस'च्या साऊथ व्हर्जनसाठी मिळाले होते 25 कोटी...
बिग बॉसच्या साऊथ व्हर्जनसाठी ज्युनिअर एनटीआरला 25 कोटी रुपये मिळाले होते. मानधनाचा हा आकडा KBC चे तेलुगु व्हर्जन होस्ट करणारे नागार्जुन आणि चिरंजीवी यांच्या मानधनापेक्षा अधिक होता. ज्युनिअर एनटीआरने स्टूडेंट नंबर 1, सिम्हाद्री, बादशाह, टेम्पर, जनता गरजे आणि जय लवकुश या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

इलेक्शन कॅम्पनदरम्यान घडली होती गंभीर दुर्घटना...
- 2009च्या जनरल इलेक्शनवेळी तेलुगुदेशम पक्षाच्या कॅम्पेननंतर हैदराबादला परत असताना ज्युनियर एनटीआरच्या कारला नलगोंडाच्या सूर्यापेट येथे गंभीर अपघात झाला होता.
- हा अपघात एवढा भयावह होता, की एनटीआर आणि त्याचे काही मित्र कारमधून बाहेर फेकले गेले होते. त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर कृष्णा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स येथे उपचार करण्यात आले होते.


ज्युनियर एनटीआरच्या वडिलांनी दोनदा केले होते लग्न...
- ज्युनियर एनटीआरचे वडील नंदमूरी हरिकृष्ण यांनी 1973 साली पहिले लग्न लक्ष्मी यांच्यासोबत झाले होते. त्यांना जानकी राम आणि कल्याण राम ही दोन मुले आणि सुहासिनी ही एक मुलगी आहे. 
- त्यानंतर नंदमूरी यांनी शालिनी यांच्यासोबत दुसरे लग्न थाटले. या लग्नापासून त्यांना ज्युनियर एनटीआर हा मुलगा आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, ज्युनिअर एनटीआरचे पत्नी आणि मुलांसोबतचे खास PHOTOS...