आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा बाबा होणार आहे हा सुपरस्टार, एकेकाळी अडचणीत सापडले होते लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्या फोटोत पत्नी लक्ष्मी प्रणितीसोबत आणि दुस-या फोटोत मुलगा अभय रामसोबत ज्युनिअर एनटीआर - Divya Marathi
पहिल्या फोटोत पत्नी लक्ष्मी प्रणितीसोबत आणि दुस-या फोटोत मुलगा अभय रामसोबत ज्युनिअर एनटीआर

मुंबई/हैदराबादः दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर पुन्हा एकदा बाबा होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, ज्युनिअर एनटीआरची पत्नी लक्ष्मी प्रणिती यावर्षी मे महिन्यात दुस-या बाळाला जन्म देणार आहे. पण अद्याप कुटुंबीयांकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ज्युनिअर एनटीआरला एक मुलगा असून त्याचे नाव अभय राम आहे. 1983 मध्ये हैदराबाद येथे जन्मलेला ज्युनिअर एनटीआर गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते आणि आंध्रप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचा नातू  आहे. 

 

लग्नावरुन निर्माण झाला होता असा गोंधळ...
2010 साली विजयवाडा येथील वकील सिंगुलुरी शांती प्रसाद यांनी ज्युनिअर एनटीआरविरुद्ध चाइल्ड मॅरेज अॅक्टविरुद्ध केस दाखल केली होती. यात त्यांचे म्हणणे होते, की ज्युनिअर एनटीआरची पत्नी लग्नाच्यावेळी केवळ 17 वर्षाची आहे. ती मे 2011मध्ये 18 वर्षाची होणार होती. ज्युनिअर एनटीआरने लक्ष्मी प्रणितीसोबत मार्च 2011 साली साखरपुडा केला होता. त्यानंतर त्याने कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी 5 मे 2011 रोजी प्रणितीसोबत विवाह केला.  

 

इलेक्शन कॅम्पेनदरम्यान झाला होता गंभीर अपघात..
- 2009 साली झालेल्या जनरल इलेक्शनमध्ये तेलुगुदेशम पार्टीच्या कॅम्पेनदरम्यान हैदराबादला परतत असताना ज्युनिअर एनटीआरला मोठा अपघात झाला होता. हा अपघात इतका मोठा होता, की त्यावेळी कारमधील लोक बाहेर फेकले गेले होते. या अपघातात ज्युनिअर एनटीआर गंभीर जखमी झाला होता. 
- कृष्णा इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे त्याच्यावर उपाचार झाले होते. 

 

ज्युनिअर एनटीआरच्या वडिलांचे दोन लग्न...
ज्युनिअर एनटीआरचे वडील नंदमूरी हरिकृष्ण यांनी 1973 मध्ये पहिले लग्न लक्ष्मीसोबत केले होते. पहिल्या लग्नापासून त्यांना दोन मुले जानकी राम आणि कल्याण राम तर एक मुलगी असून तिचे नाव सुहासिनी आहे. त्यानंतर त्यांनी शालिनीसोबत दुसरे लग्न थाटले. दुस-या लग्नापासून त्यांना ज्युनिअर एनटीआर हा मुलगा झाला. 


पुढील स्लाईड्सवर बघा, ज्युनिअर एनटीआर आणि त्याच्या फॅमिलीचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...