आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजोल कोणालाही दाखवणार नाही तिच्या करियरच्या सुरुवातीच्या काळातील हे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - काजोल ही बॉलिवूडमधील एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 1992 मध्ये आलेल्या 'बेखुदी' चित्रपटातून डेब्यू केला होता. या चित्रपटात तिच्याबरोबर को-स्टार होता कमल सदाना, हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत काजोलच्या लूकमध्ये बराच फरक पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आज काजोल जेवढी गॉर्जियस दिसते तशी ती बॉलिवूड डेब्यूदरम्यान दिसत नव्हती. त्या काळातील काजोलचे फोटो पाहिले तर तिचे काही विचित्र लूक पाहायला मिळतील. आज काजोलचे असेच काही फोटो आपण पाहणार आहोत. काजोलने तिच्या लूकसाठी ट्रिटमेंटही घेतली आहे.

 

अनेक सुपरहिट चित्रपट..
काजोलने 25 वर्षांच्या करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. पहिला चित्रपट फ्लॉप झाला तरी तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. त्यानंतर डायरेक्टर अब्बास-मस्तान यांनी 'बाजीगर' (1993) मध्ये तिला संधी दिली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर काजोलने मागे वळून पाहिले नाही. तिने शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार, सैफ अली खान, अजय देवगनसह अनेक सुपरस्टार्सबरोबर स्क्रीन शेयर केले. काजोलने 'ये दिल्लगी' (1994), 'करन-अर्जुन' (1995), 'हलचल' (1995), 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' (1995), 'इश्क' (1997), 'प्यार तो होना ही था' (1998), 'दुश्मन' (1998), 'प्यार किया तो डरना क्या' (1998), 'कुछ कुछ होता है' (1998), 'फना' (2006), 'माय नेम इज खान' (2010) सह अनेक चित्रपटांत काम केले आहे.

 

दोन वर्षांपूर्वी काजोल एका इव्हेंटमध्ये पोहोचली तेव्हा तिचा लूक पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. तिचा रंग एकदम गोरा दिसत होता. काजोलने फेयरनेस क्रीमच्या जाहिरातीसाठी लाइटनिंग ट्रीटमेंट घेतली असल्याची चर्चा तेव्हा होती. 

 

काजोल आणि अजय देवगन यांनी 1999 मध्ये लग्न केले होते. दोघांची भेट 'हलचल' (1995) चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हळू हळू दोघांची दोस्ती आणि प्रेम जुळले. त्यांचे लग्न पारंपरिक मराठी पद्धतीने झाले होते. दोघांना मुलगी न्यासा (14 वर्ष) आणि मुलगा युग (7 वर्ष) ही दोन मुले आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, काजोलचे जुन्या काळातील काही विचित्र लूकमधील PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...