आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • काजोल, अजय देवगण, न्यासा,Kajol Emotional Message On Daughter Nysa Birthday

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 वर्षांची झाली अजय देवगणची मुलगी, भावूक झालेल्या आई काजोलने दिला हा सल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यासा आणि काजोल - Divya Marathi
न्यासा आणि काजोल

मुंबईः अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगणची थोरली लेक न्यासा हिचा आज (20 एप्रिल) वाढदिवस असून ती 15 वर्षांची झाली आहे. न्यासा काजोलच्या अतिशय जवळची आहे. काजोलने ट्वीटरच्या माध्यमातून न्यासाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

 

काजोलने लिहिले,  वुमन एम्पॉव्हरमेंट ख-या अर्थाने तेव्हाच होईल, जेव्हा तुमच्याजवळ मुलगी असेल. काजोल लिहिले,  'If u want true women’s empowerment.... have a daughter. There is nothing that breaks through cultural biases, preconceived notions, childhood conditioning etc faster than your own child! Happy happy birthday to my own little breakthrough Nysa❤️❤️❤️. तिच्या या पोस्टला आतापर्यंत अडीच हजार लाइक्स मिळाले आहेत. 


इन्स्टाग्रामवर शेअर केला न्यासाचा क्यूट फोटो... 

काजोलने आपल्या इन्स्टाग्रामवर न्यासाचा एक फोटो शेअर करुन त्यासोबत लिहिले, 'From crayons and teddy bears to a young lady. Happy birthday to my smart ,beautiful , brave , cuteness overload and seriously humbling daughter Nysa . May the sun shine out of your eyes always and may you always walk in'.


सिंगापूरमध्ये शिकत आहे न्यासा...
न्यासा आता सिंगापूरमध्ये शिकत आहे. अजय आणि काजोल फेब्रुवारी महिन्यात लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी न्यासाकडे सिंगापूरला गेले होते. न्यासाला एक धाकटा भाऊ असून यूग हे त्याचे नाव आहे. यूग आता सात वर्षांचा आहे. 

 

काजोल अखेरची 'वीआईपी-2' या दाक्षिणात्य चित्रपटात झळकली होती. सध्या ती प्रदीप सरकार यांच्या 'एला' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा चित्रपट आनंद गांधींच्या 'Beta, Kaagdo' या गुजराती नाटकावर आधारित आहे. यामध्ये तिच्यासोबत नेहा धुपिया आणि रॉय चौधरी झळकणार आहेत. तर अजय याचवर्षी मार्चमध्ये रिलीज झालेल्या  'रेड' या चित्रपटात झळकला होता.


पुढील स्लाईड्सवर बघा, काजोल आणि अजयची लाडकी लेक न्यासाचे फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...