आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kangana Ranaut Manali House Inside Photos पहिल्यांदा समोर आले कंगना रनोटच्या ड्रीम होमचे Inside Photos

पहिल्यांदा समोर आले कंगना रनोटच्या ड्रीम होमचे Inside Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटच्या मनालीस्थित नवीन घराचे फोटोज समोर आले आहेत. कंगनाच्या नवीन घराचे फोटोज आर्किटेक्चुअल डाइजेस्ट इंडिया मॅगझिनच्या मे महिन्याच्या अंकासाठी क्लिक करण्यात आले आहेत. या फोटोजमध्ये आठ बेडरुमच्या या घरातील कंगनाची रुम अतिशय खास आहे. कंगना मुळची हिमाचलची आहे. त्यामुळे तिच्या खोलीत हिमाचलची खास झलक बघायला मिळतेय. तिच्या घराचे इंटेरिअर डिझायनर ऋचा बहल यांनी केले आहे. 


30 कोटी आहे कंगनाच्या घराची किंमत...
कंगनाच्या या नवीन घराची किंमत 30 कोटी रुपये आहे. तिने या घरासाठी 10 कोटींची जमीन खरेदी केली होती. त्यानंतर 20 कोटी रुपये खर्च करुन आलीशान घर उभे केले. या लग्झरी बंगल्यात एकुण आठ रुम आहेत. याशिवाय डायनिंग रूम, फायर प्लेस, जिम आणि एक योगा रुम आहे. कंगनाच्या बेडरुममध्ये क्लासिकल आर्मचेअर आणि जयपूर रग्स कार्पेट बघायला मिळतंय. भिंतींवर मुंबईहून खरेदी करण्यात आलेले कस्टमाइज पीस लावण्यात आले आहेत आणि बेड राफ लॉरेनच्या होम कलेक्शनमधून खरेदी करण्यात आला आहे. प्रवेशद्वारावर वेगळ्या पद्धतीच्या फ्रेम्स लावण्यात आल्या असून पाहुण्यांची बेडरुम ऑरेंज लेनने डिझाइन करण्यात आली आहे.


कंगना रनोटचे फॅमिली बॅकग्राऊंड...
कंगनाचे वडील अमरदीप रनोट बिझनेसमन आहेत, तर आई आशा रनोट शिक्षिका आहेत. कंगनाला एक थोरली बहीण असून तिचे नाव रंगोली आहे. रंगोली कंगनाची मॅनेजर असून तिचे व्यावसायिक काम ती सांभाळते. एकतर्फी प्रेमातून रंगोलीवर अॅसिड हल्ला झाला होता. त्यानंतर तिच्यावर ब-याच शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या. अॅसिड हल्ल्या सामोरे गेलेल्या रंगोलीच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची कंगनाची इच्छा आहे. कंगना आणि रंगोलीचा एक धाकटा भाऊ असून अक्षत रनोट हे त्याचे नाव आहे.


या चित्रपटांमध्ये झळकली आहे कंगना रनोट...
23 मार्च 1987 रोजी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्याजवळील  सुरजपूर (भाबंला) येथे कंगनाचा जन्म झाला. 2006 मध्ये तिने गँगस्टर या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 'फॅशन', 'वो लम्हें', 'लाइफ इन मेट्रो', 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई', 'तनु वेड्स मनु', 'क्वीन', 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' या सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केले. तर 'रिवॉल्वर रानी', 'नो प्रॉब्लेम', 'नॉक आउट', 'आय लव एन वाय', 'कट्टी-बट्टी', 'रंगून' हे काही फ्लॉप चित्रपटही कंगनाच्या नावावर जमा आहेत. 


सोर्स- AD मॅगझिन


पुढील स्लाईड्सवर बघा, कंगनाच्या मनालीस्थित घराचे Inside Photos

बातम्या आणखी आहेत...