आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dhadak Trailer:'या' व्यक्तीमुळे जाह्नवी कपूर आणि ईशान खट्टरला मिळाला 'धडक'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शशांक खेतानचा चित्रपट 'धडक'द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. धडक चित्रपटात जान्हवीसोबत मुख्य भूमिकेत झळकलेल्या शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर झळकला आहे. जान्हवी-ईशानची जोडी अगोदरपासूनच चर्चेचा विषय होती. या ट्रेलरमध्ये दोघांची केमिस्ट्री स्पष्ट कळून येत आहे. 

धडकच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये जान्हवी आणि ईशानसोबत दिग्दर्शक शशांक खेतान आणि करण जोहरही उपस्थित होता. यावेळी पत्रकारांनी टीमला अनेक प्रश्न विचारले.  या इव्हेंटदरम्यान करण जोहरने जान्हवी आणि ईशानला कसे या चित्रपटात घेतले याविषयी सांगितले. 
 
सर्वात प्रथम जान्हवीबद्दल सांगताना करण जोहर म्हणाला की, मी जान्हवीला कधी पाहिले नव्हते पण मनीष मल्होत्राने तिची अनेकदा माझ्याजवळ स्तुती केली. त्यामुळे एके दिवशी मी जान्हवीला भेटायचे ठरवले. मी एकट्यात तिला भेटायचे ठरवले आणि तिला काही स्क्रिप्टस वाचायला दिले. यानंतर मला जाणवले की आईप्रमाणेच जान्हवीमध्ये सुद्धा अभिनयाची झलक दिसते. 

 

याच इवेंटमध्ये करण जोहरने ईशानविषयी सांगितले की, मी ईशानला इन्सटाग्रामवर पाहिले होते आणि एका शोच्या सेटवर मी शाहिदला म्हणालो की मला तुझ्या भावाला भेटायचे आहे.  ईशानला भेटल्यावर मी ठरवले की मी जान्हवी आणि ईशानला एका चित्रपटात कास्ट करणार.

हा चित्रपट येत्या 20 जुलैला रिलीज होणार आहे. चित्रपटात जान्हवी मेवाडी बॅकग्राउंडची दाखवण्यात आली आहे. धडकची कथा ऑनर किलींगवर आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, जान्हवी-ईशानचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...