आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैमूरला वेळ न देण्याच्या प्रश्नावर भडकली करीना कपूर, म्हणाली 'मला दवंडी पिटायची गरज नाही'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - करीना कपूरचा कमबॅक चित्रपट 'वीरे दी वेडिंग' बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. चित्रपटाने आतापर्यंत 70 कोटींहून जास्त कमाई केली आहे. करीनासोबत या चित्रपटात सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांनी मुख्य भूमिका केली होती. यावेळी प्रमोशनदरम्यान करीनाला एक असा प्रश्न विचारण्यात आला की करीनाचे रागावरचे नियंत्रण सुटले. ती म्हणाली, दवंडी पिटायची गरज नाही...

 

करीनाने सांगितले की तैमूरसोबत घालवते तो वेळ फक्त माझा आहे आणि यामुळे मी सोशल मीडिया यूजर्सला आणि मीडियाला काही स्पष्टीकरण देण्यास बांधील नाही. तैमूरसोबत फोटो शेअर करत नाही म्हणून त्याच्यासोबत वेळ घालवत नाही असा अर्थ काढणे चुकीचे आहे.  

 

तैमूरची साधारण मुलांप्रमाणे व्हावी देखभाल..
करीनाने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की तिला तैमूरचे पालनपोषण इतर मुलांचे होते तसेच व्हावे असे वाटते. तैमूरला नेहमी बॉडीगार्डसच्या गराड्यात ठेवावे लागणार नाही अशी आमची इच्छा आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, तैमूर-करीनाचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...