आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनम आणि अर्जुन कपूरसोबत लंडनमध्ये चिल करताना दिसली करीना कपूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'वीरे दि वेडिंग' चित्रपटाच्या यशानंतर करीना आणि सोनम कपूर सध्या लंडनमध्ये एन्जॉय करत आहेत. येथे त्यांना कंपनी देण्यासाठी रिया आणि अर्जुन कपूर पोहोचले. अर्जुन येथे 'नमस्ते इंग्लँड' चित्रपटाची शूटिंग करण्यासाठी पोहोचला. करीना, सोनम आणि अर्जुनने एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये तिघंही पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. अर्जुनने काही फोटोज शेअर करत लिहिले - In great company !!! #londonsummer with the Veere s & @samyuktanair of course... #bebokillingit and the #kapoorsisters killing it... @rheakapoor @sonamkapoor. यासोबतच आज (9 जून) रोजी सोनम कपूरचा वाढदिवस आहे. ती लंडनमध्ये आपला वाढदिवस साजरा करणार आहे.

 

1 जूनला रिलीज झाला 'वीरे दि वेडिंग' ने ओपनिंग डे ला 10.75 कोटी बिझनेस केला होता. यानंतर आतापर्यंत या चित्रपटाने 52 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला आहे. तरुणांना हा चित्रपट पसंत पडत आहे. 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाची कथा चार फ्रेंड्सच्या भोवती फिरते. हे एका रोड ट्रिपवर जातात. या चौघीही बोल्ड आणि शिवी गाळ करताना दिसतात. रिलेशनशिपविषयी या खुलेपणाने बोलताना दिसतात. डायरेक्टर शशांक घोषच्या या चित्रपटात करीनासोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट सोनम कपूरची बहिण रिया, एकता कपूर, शोभा कपूर आणि निखिल अडवाणीने प्रोड्यूस केला आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अर्जुन कपूर, करीना कपूर, सोनम कपूर, रिया कपूरचे लंडन येथील फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...