आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला सांगण्यात येत होते की, लग्नानंतर काम मिळणार नाही, मी हे बदलले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जे लोक म्हणत होते की, मला लग्नानंतर काम मिळणार नाही, मी त्यांना चुकीचे सिध्द केले. मला चित्रपटांच्या ऑफर मिळत आहेत. परंतू मी निर्णय घेतला आहे की, वर्षातून फक्त एकच चित्रपट करायचा. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत करीना कपूरने असे विधान केले. तिने मुलाखतीत सांगितले की, तिचा मुलगा, नवरा आणि कुटूंब हे सर्वात आधी आणि नंतर चित्रपट. यामुळे मी चित्रपट आणि पर्सनल लाइफमध्ये बॅलेन्स बनवते आहे. याच महिन्यात करीना कपूरचा 'वीरे दी वेडिंग' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने जवळपास 70 कोटींची कमाई केली आहे.


धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटाची ऑफर
- 'वीरे दी वेडिंग' च्या यशानंतर आता समोर आले आहे की, करीनाला धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट ऑफर झाला आहे.
- करीनाने मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिचे काही प्रोजेक्ट्स पाइपलाइनमध्ये आहेत. परंतू हे प्रोजेक्ट फ्लोरवर येण्यास खुप वेळ लागेल. कारण तिला मुलगा तैमूरसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे.
- करीनाने मुलाखतीत सांगितले की, ती वर्षातून फक्त एकच चित्रपट करणार आहे.
- एका प्रश्नाचे उत्तर देताना करीनाने सांगितले की, तिचा नवरा बिझनेसमन नाही की तो संध्याकाळी 6 वाजता घरी येईल. तो अॅक्टर आहे, यामुळे तो जेव्हा शूटिंगमध्ये व्यस्त असतो, तेव्हा मी तैमूरसोबत राहते. आम्हाला मुलासाठी सर्व काही अॅडजस्ट करावे लागते.
- करीनाने सांगितले की, सैफने आणि तिने ठरवले आहे की, चित्रपटाची शूटिंग बॅलेन्स करणार आहे.
- करीनाने सांगितले की, सैफ सध्या नवदीप सिंहच्या चित्रपटाची शूटिंग करत आहेत. हा चित्रपट नोव्हेंबरपर्यंत पुर्ण होईल. त्यानंतर ती आपल्या प्रोजेक्टरवर काम करेल. कारण तैमूरजवळ आई-बाबापैकी कुणीत तरी एकजण असायला हवे.
- सध्या करीना नवरा आणि मुलासोबत लंडनमध्ये सुट्या एन्जॉय करतेय.

बातम्या आणखी आहेत...