आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईः अभिनेत्री करिश्मा कपूर घटस्फोटानंतर मुलगी समायरा आणि मुलगा कियानची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहे. करिश्मा अधूनमधून मुलांची भेट त्यांचे वडील संजय कपूरसोबत घालून देत असते. इतकेच नाही तर समायराच्या तेराव्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये संजय कपूरसुद्धा सामील झाले होते. वडिलांसोबत पोज देतानाचे समायराचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर झाले आहेत.
संजयच्या तिस-या पत्नीने शेअर केले फोटोज...
- बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेवने सोशल मीडियावर शेअर केले असून यामध्ये वडील-मुलीची स्ट्राँग बाँडिंग बघायला मिळत आहे.
- करिश्मानेसुद्धा तिच्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिचा बालपणीचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
2016 मध्ये झाला करिश्मा-संजयचा घटस्फोट...
- 13 जून 2016 रोजी मुंबईतील फॅमिली कोर्टात संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचा घटस्फोट झाला होता.
- घटस्फोटानंतर संजयने दोन्ही मुलांच्या नावी 10 कोटी केले होते. तर करिश्माला एक डुप्लेक्स बंगला दिला.
- संजय दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलत आहेत.
2012 पासून वेगळे राहात होते करिश्मा-संजय
- करिश्माने 29 सप्टेंबर 2003 रोजी बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले होते. करिश्माचे हे पहिले तर संजयचे दुसरे लग्न होते.
- 2012 पासून हे दोघे वेगळे राहात होते. करिश्मा मुंबईत आई बबितासोबत राहात होती.
- संजयने एप्रिल 2017 रोजी प्रिया सचदेवसोबत कोर्ट मॅरेज केले होते. दोघे पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. संजयचे हे तिसरे लग्न आहे.
पुढील स्लाईड्सवर बघा, मुलांसोबतची करिश्मा आणि संजय कपूरची निवडक छायाचित्रे...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.