आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day:लग्नानंतर आर्थिक तंगीत गेले अनुपम-किरण यांचे दिवस, अनेक दिवस नव्हते हातात काम!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांचा आज वाढदिवस. 14 जून 1955 रोजी पंजाब येथील चंडीगढमध्ये त्यांचा जन्म झाला. चित्रपटांशिवाय  टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणूनही किरण खेर काम पाहत आहेत. त्यांनी आतापर्यंत 34हून जास्त चित्रपटात अभिनय केला आहे. किरण खेर आणि अनुपण खेर यांची एकमेकांसोबत दुसरे लग्न केले आहे. आज किरण यांच्या वाढदिवसानिमित्त काही खास गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
 
किरण खेर आणि अनुपम खेर यांची पहिली भेट चंडीगढमध्ये झाली होती. दोघेही पहिले थिएटरमध्ये काम करत. कामाच्या ठिकाणी हे दोघे चांगले फ्रेंड्स बनले आणि त्यांची ही मैत्री लवकरच प्रेमात बदलली. सुरुवातीच्या दिवसांत त्यांना कळाले नाही की 
त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आहे.  

 

किरण खेर या 1980च्या काळात चित्रपटांता काम करण्यासाठी मुंबईला पोहोचल्या होत्या. त्यावेळी किरण यांनी एका मोठ्या बिझनेसमनसोबत लग्न केले. काही वर्षानंतर त्यांनी सिकंदर मुलाला जन्म दिला आणि लवकरच किरण आणि गौतम यांना त्यांनी लग्न करुन चूक केली की काय असे वाटू लागले. 

किरण आणि गौतम या दोघांना नात्यातून बाहेर पडायचे होते तर अनुपम खेर यांनी कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार 1979 साली मधुमालती नावाच्या मुलीसोबत लग्न केले पण अनुपमसुद्धा त्यांच्या वैवाहीक जीवनात खूश नव्हते. जेव्हा नादीरा बब्बरच्या प्लेसाठी दोघे कोलकाता येथे गेले तेव्हा या दोघांना त्यांच्यात काहीतरी आहे असे वाटले. प्ले संपल्यानंतर काही दिवसांतच अनुपम यांनी किरण यांना प्रपोज केले. 

 

एका मुलाखतीत अनुपम यांनी कसे प्रपोज केले याविषयी किरण यांनी सांगितले की पहिले त्यांना ही सर्व थट्टा वाटली कारण अनुपम नेहमीच इतर मुलींसोबत थट्टा-मस्करी करत असत पण नंतर समजले की ते खरेच माझ्यावर प्रेम करतात. यानंतर दोघांचे भेटणे सुरु झाले आणि त्यांनी आपापल्या पार्टनरला घटस्फोट देत लग्न केले. किरण एका मुलाच्या आई होत्या पण दुसऱ्या लग्नानंतर त्यांनी मुलाला जन्म दिला नाही.

 

किरण यांनी जीवनाच्या प्रत्येक वळणावर अनुपम यांना साथ दिली. दोघांच्या जीवनात अशीही वेळ आली जेव्हा अनुपम आर्थिक तंगीत होते त्यामुळे किरण यांनी पुन्हा काम करण्यास सुरुवात केली. अनुपम यांच्याकडे अनेक दिवस काम नव्हते. त्यांच्यात अनेक वादविवादही झाले पण किरण यांनी समजुतदारपणे सर्व परिस्थिती सांभाळली आणि आज हे दोघे त्यांच्या वैवाहीक आयुष्यात खूश आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा,  किरण खेर आणि अनुपम खेर यांचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...