आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरण खेरचे पहिले पती होते गौतम बेरी, या प्रसिद्ध मॉडेलसोबत केले होते दुसरे लग्न, पाहा Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - प्रसिद्ध अभिनेत्री किरण खेर यांनी नुकताच त्यांचा 62 वा वाढदिवस साजरा केला. आपणा सर्वांनाच माहीत आहे की किरण खेर यांनी अनुपम खेरसोबत दुसरे लग्न केले आहे. किरण खेर यांनी पहिले लग्न बिझनेसमन गौतम बेरी यांच्यासोबत केले होते. मुलाच्या जन्मानंतर किरण खेर आणि गौतम बेरी यांच्यात काहीच आलबेल नव्हते. त्यानंतर त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. यानंतर किरण खेर यांनी अभिनेता अनुपम खेरसोबत तर गौतम बेरी यांनी प्रसिद्ध मॉडेल नंदिनी सेनसोबत लग्न केले होते. लग्नानंतर नंदिनी यांनी मॉडेलिंग सोडले आणि मुलगी ताराला जन्म दिला. आता त्या अध्यात्मचाचे धडे लोकांना देतात. २०१३ साली गौतम बेरी यांचा मृत्यू झाला.


अमिताभ यांच्याशी आहै गौतम बेरी यांचे खास नाते...
सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि गौतम बेरी यांचे खास नाते होते. मुंबईत स्ट्रगलिंगच्या काळात हे दोघे एकमेकांचे रुममेट्स होते. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन सुपरस्टार बनले आणि गौतम बेरी यशस्वी उद्योजक आणि त्यानंतरही या दोघांचे नाते कायम राहिले. अमिताभ यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक आणि गौतम यांचा मुलगा सिकंदर हे एकमेकांचे खूप जवळचे मित्र आहेत.

 

गौतम यांच्या मुलीनेही केला आहे बॉलिवूड प्रवेश..
गौतम यांनी नंदिनी यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते आणि त्यांना एक मुलगी झाली. तारा अलिशा असे नाव असलेली गौतम यांची मुलगी बॉलिवूड अभिनेत्री आहे. तारा अलिशाने 'लव्ह गेम्स' या चित्रपटातून बॉलिवूड प्रवेश केला होता त्यानंतर तिने टीव्हीवरही काम केले आहे.  

 

किरण-अनुपम यांच्यासोबतही जपले मित्रत्वाचे नाते...
गौतम यांची खासियत म्हणजे त्यांनी घटस्फोटानंतरही किरण यांच्याबरोबर मैत्रीचे नाते कायम ठेवले. याचे उदाहरण म्हणजे किरण खेर, अनुपम खेर यांच्याबरोबर त्यांच्या भेटीगाठीही होत असत. इतकेच नव्हे गौतम यांच्या मृत्यूनंतर अनुपम खेर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक खास संदेशही लिहीला होता. अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले होते.

 

मुलगा ठरला फ्लॉप...
गौतम बेरी यांचा मुलगा सिकंदर लहान असतानाच किरणसोबत त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अनुपम यांच्याशी लग्न केल्यानंतर सिकंदरला अनुपम यांनी आपले नाव दिले. अनुपम आणि किरण यांना स्वतःचे मुल झाले नाही. सिकंदरने 2008साली वुडस्टॉक व्हिला या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता पण सिंकंदरच्या नावाची काही जास्त चर्चा झाली नाही तसेच मुलगी तारा अलिशालाही इंडस्ट्रीत हवे तसे यश अजून मिळाले नाही. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, गौतम बेरी यांच्या कुटुंबियांचे काही खास फोटोज्..

 

बातम्या आणखी आहेत...