आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपूर घराण्यातील या सदस्यांना तुम्ही ओळखलंत का! कुणी ठरले Flop, कुणी राहिले सिनेमांपासून दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये शो मॅन म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांची आज 93 वी जयंती आहे. 14 डिसेंबर 1924 रोजी पेशावर (पाकिस्तान) येथे त्यांचा जन्म झाला होता. राज कपूर यांना कपूर घराण्यातील सर्वात यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जाते. त्यांनी केवळ अभिनयातच नव्हे तर दिग्दर्शन क्षेत्रातसुद्धा नाव कमावले होते. राज कपूर यांच्याशिवाय शशी कपूर, शम्मी कपूर, ऋषी कपूरसह अनेक सदस्य फिल्मी दुनियेत कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य असे आहेत, ज्यांनी सिनेमांपासून लांब राहणे पसंत केले. तर काही येथे फ्लॉप ठरले. यामध्ये ऋषी कपूर यांचे धाकटे भाऊ राजीव कपूर, त्यांचे काका शशी कपूर आणि शम्मी कपूर यांच्या मुलांचा समावेश आहे.  1931 मध्ये पृथ्वीराज कपूर यांनी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते. तेव्हापासून त्यांच्या अनेक पिढ्या इंडस्ट्रीत आल्या. 

 

ही आहे पृथ्वीराज कपूर यांची वंशवेल...

 

> पृथ्वीराज कपूर आणि रमसरनी मेहरा कपूर 
मुले - राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, उर्मिला कपूर

 

> राज कपूर आणि कृष्णा 
मुले - रणधीर कपूर, ऋतु नंदा, ऋषी कपूर, रीमा जैन, राजीव कपूर

 

> ​शम्मी कपूर आणि गीता बाली 
मुले - आदित्य कपूर आणि कंचन कपूर देसाई

 

>  शशी कपूर आणि जेनिफर केंडल
मुले- करण कपूर, कुणाल कपूर, संजना कपूर

 

>  रणधीर कपूर आणि बबिता 

मुली- करिश्मा कपूर (पती - संजय कपूर -आता घटस्फोट झाला आहे) आणि करीना कपूर (पती - सैफ अली खान)

 

> ​रितू नंदा आणि राजन नंदा
मुले - निखिल नंदा (पत्नी - श्वेता बच्चन नंदा (अमिताभ बच्चन यांची लेक) आणि नताशा नंदा

 

> ​ ऋषी कपूर आणि नीतू सिंह 
मुले- रिद्धिमा साहनी (पती - भरत साहनी) आणि रणबीर कपूर

 

> ​रीमा जैन आणि मोहित जैन 

मुले- अरमान आणि आदर जैन

 

> ​राजीव कपूर आणि आरती सभरवाल (दोघांचा घटस्फोट झाला आहे.)

 

पुढील स्लाईड्समध्ये भेटा कपूर फॅमिलीतील अशा काही सदस्यांना ज्यांना तुम्ही कदाचितच ओळखत असाल...

बातम्या आणखी आहेत...