आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 Cr रु. आहे या फेमस कॉमेडियनची फीस, अमिताभ बच्चनसोबत केलंय काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई/हैदराबादः अमिताभ बच्चन स्टारर सूर्यवंशम या सिनेमाच्या रिलीजला 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. सिनेमात जयसुधा आणि सौंदर्या या दोन दाक्षिणात्य अभिनेत्रींनी मत्त्वाची भूमिका साकारली होती. मात्र या सिनेमात आणखी एका दाक्षिणात्य कलाकाराची एक महत्त्वाची भूमिका होती. या अभिनेत्याचे नाव आहे ब्रह्मानंदम. हीरा ठाकूर (अमिताभ बच्चन) गौरी (रचना बॅनर्जी)ला जेव्हा रुग्णालयात घेऊन जातात, तेथे डॉक्टरच्या भूमिकेत असलेला अभिनेता हा ब्रह्मानंदम आहेत. हा सीन लहान असला, तरी लक्षात राहणारा होता.


एक कोटी रुपये आहे ब्रह्मानंदम यांची फीस... 

- ब्रह्मानंदम यांनी मागील वर्षी जुलैमध्ये मानधन वाढवून 1 कोटी केले आहे. आता ते प्रत्येक सिनेमासाठी 1 कोटी रुपये मानधन घेतात. त्यांनी हा निर्णय आपल्या लोकप्रियतेमुळे घेतला. एखाद्या कॉमेडिअनला एवढे मानधन मिळणे मोठी गोष्ट आहे. 

- 61 वर्षीय ब्रह्मानंदम यांनी दोन दशकांपेक्षा जास्त करिअरमध्ये 1000 पेक्षा अधिक सिनेमांत काम केले आहे.
- ‘अहा ना पेल्लंता’, ‘अप्पुला अप्पा राव’, ‘किंग’, ‘रेड्डी’, 'रच्चा' 'आर्या 2'  आणि ‘बपालू’ ही त्यांच्या काही हिट सिनेमांची नावे आहेत. 

 

आंध्रप्रदेशात झाला जन्म.. 
- आंध्र प्रदेशातील साटेनापल्ली जिल्ह्यातील मुपल्ला गावात 1 फेब्रुवारी 1956 रोजी ब्रह्मानंदम यांचा जन्म झाला. 
- त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे संपूर्ण कुटुंबात ब्रह्मानंदमच एकमेव एमए पर्यंत शिकलेले सदस्य होते. 
- त्यांनी पदव्यूत्तर शिक्षण घेतल्यानंतर अत्तिल्ली कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. कॉलेजमध्ये ते नेहमी विद्यार्थ्यांना मिमिक्री करुन हसवायचे.

 

साऊथच्या प्रत्येक दुस-या सिनेमात असतात ब्रह्मानंदम 
- ब्रह्मानंदम  असे एक अभिनेते आहेत, जे साऊथच्या प्रत्येक दुस-या सिनेमात दिसतात. प्रत्येक अभिनेता आणि दिग्दर्शक त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असतो. 
- ब्रह्मानंदम यांनी सांगितले, की एकदा त्यांच्या मित्राने त्यांचे नाव ब्रह्मानंदम हे कसे पडले याविषयी त्यांना विचारणा केली. माझ्या वडिलांनीसुद्धा या नावाचा अर्थ मला सांगितला नव्हता. मग मी नावाचा अर्थ शोधून काढला. तेव्हा मला समजले, की माझ्या नावचा अर्थ (द हॅपीनेस ऑफ द यूनिवर्स) म्हणजेच ब्रम्हांडचा आनंद असा होतो.


पुढील स्लाईड्सवर बघा, इंटरनेटवर शेअर होणारे ब्रह्मानंदम यांचे फनी फोटोज आणि सोबतच जाणून घ्या त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बरंच काही..  

 

बातम्या आणखी आहेत...