आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता निवृत्त होणार एव्हरग्रीन रेखा.. कोट्यवधीच्या संपत्तीच्या आहेत मालकिण, अशी आहे Lifestyle

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आता राज्यसभेतील चेहरे बदलणार आहेत. सभागृहाचे ग्लॅमर समजले जाणारे अनेक चेहरे संसदेमध्ये दिसणार नाहीत. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या स्टार्समध्ये साऊथचे सुपरस्टार चिरंजीवी, जया बच्चन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या नावाचा सहभाग आहे.

 

divyamarathi.com या सेलिब्रिटी पॉलिटिशिअन्सच्या खासगी आयुष्याशी निगडीत खास गोष्टी वाचकांना सांगत आहे. याअंतर्गत आज जाणून घेऊयात, एव्हरग्रीन रेखा यांच्या खासगी आयुष्याविषयी आणि सोबतच कसा होता त्यांचा राज्यसभेतीला पहिला दिवस...


तामिळ स्टारची मुलगी आहे रेखा...
10 ऑक्टोबर 1954 रोजी मद्रास (आता चेन्नई) मध्ये जन्मलेल्या रेखा या प्रसिद्ध तामिळ स्टार जेमिनी गणेशन यांच्या कन्या आहेत. रेखा यांच्याशिवाय जेमिनी यांना एकुण सात मुलेमुली (6 मुली आणि 1 मुलगा) आहे. त्यांची नावे विजया चामुंडेश्वरी, सतीश कुमार, राधा उस्मान सैयद, रेवती स्वामीनाथन, कमला सेल्वराज, नारायणी गणेश आणि जया श्रीधर अशी आहेत.


रेखा यांच्या जन्मानंतर झाले होते आईवडिलांचे लग्न...
रेखा यांच्या मातोश्री पुष्पावल्ली या प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री होत्या. त्यांनी जेमिनी गणेशन यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केले होते. याच काळात दोघांचे अफेअर सुरु झाले. रेखा या दोघांची अनौरस संतती आहे. रेखा यांच्या जन्माच्यावेळी जेमिनी गणेशन आणि पुष्पावल्ली यांचे लग्न झाले नव्हते. कित्येक वर्षे जेमिनी यांनी रेखा यांना आपली मुलगी असल्याचे मान्य केले नव्हते. काही वर्षांनी जेमिनी आणि पुष्पावल्ली यांनी लग्न केले. लग्नानंतर त्यांच्या दुस-या मुलीचा राधा उस्मान सैयदचा जन्म झाला. अर्थातच रेखा यांना एक सख्खी बहीण आहे.


असा होता राज्यसभेतील पहिला दिवस...
16 मे 2012 रोजी रेखा पहिल्यांदा खासदार म्हणून राज्यसभेत दाखल झाल्या होत्या. खासदारकीच्या पहिल्या दिवशी त्यांनी 19 मिनिटे राज्यसभेत घालविली होती. त्यादिवशी संसदेत दिवसभर रेखा यांच्याच नावाची चर्चा होती. 10 ऑक्‍टोबर 1954 रोजी जन्मलेल्या रेखा यांचे नाव राज्यसभा सचिवालयाच्या नोंदीनुसार 'कुमारी रेखा' असे पुकारण्यात आले होते. सोनेरी साडीचा अंगभर पदर घेतलेल्या रेखा यांनी ईश्‍वराला स्मरून सराईतपणे इंग्रजीतून शपथग्रहण केले होते. त्यानंतर साऱ्यांनीच त्यांचे स्वागत व अभिनंदन केले. 19 मिनिटे थांबून रेखा राज्यसभेतून बाहेर पडल्या आणि त्यांनी थेट गुरुद्वारा रकाबगंजमध्ये जाऊन माथा टेकविला होता. 


पुढे वाचा, किती कोटींच्या संपत्तीची मालकिण आहेत रेखा, काय आहे त्यांचा फिटनेस फंडा आणि कसे राहिले वैवाहिक जीवन...  

बातम्या आणखी आहेत...