आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट-अनुष्काचा विवाह वादात सापडण्याची चिन्हं... \'या\' कारणाने पुन्हा करावे लागणार लग्न?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत 11  डिसेंबर 2017 रोजी विवाहबद्ध झाली. दोघांनीही इटलीतील टस्कनीमधील एका आलिशान हॉटेलमध्ये लग्न केले. लग्नानंतर मुंबई आणि दिल्लीत त्यांनी आलिशान वेडिंग रिसेप्शनसुद्धा दिले. पण आता त्यांचा विवाह वादात सापडण्याची चिन्हं आहेत.

 

...म्हणून पुन्हा थाटावे लागणार लग्न

विराट आणि अनुष्का यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्यांचा विवाह  वादात सापडण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या लग्न सोहळ्यादरम्यान दोघांकडूनही एक चूक झाली आहे. ज्यामुळे या दोघांनाही पुन्हा विवाह करावा लागण्याची शक्यता आहे. इटलीतील टस्कनीमधील लग्नाची औपचारिक माहिती विराट आणि अनुष्काकडून इटलीची राजधानी रोममधील भारतीय दूतावासाला दिलेली नव्हती.

 

विवाहापुर्वी केली नव्हती नोंदणी...

कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीने जर दुसऱ्या देशात जाऊन लग्न केले, तर त्यांना परदेशी विवाह अधिनियम 1969 अंतर्गत याची नोंदणी करावी लागते. पण विराट आणि अनुष्काने लग्नापूर्वी अशी कोणतीही नोंदणी केलेली नाही. त्यामुळे हे लग्न वाचवण्यासाठी दोघांनाही पुन्हा एकदा विवाहबद्ध व्हावं लागण्याची शक्यता आहे.

 

अशी समोर आली ही बाब..

विरुष्काच्या लग्नासंदर्भातील ही सर्व बाब एका महिती अधिकारा अंतर्गत समोर आली आहे. अंबालाच्या एका वकीलाने या दोघांच्या विवाहावरुन माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवली होती. ज्यातून हे स्पष्ट झालं आहे.

 

लग्नानंतर कामावर परतले विराट-अनुष्का...

मुंबईतील रिसेप्शन पार पडल्यानंतर अनुष्का विराटसोबत दक्षिण आफ्रिकेला गेली होती. येथे दोघांनी न्यू इयर सेलिब्रेट केले. त्यानंतर अनुष्का आता मुंबईत परतली आहे. तर  विराट कोहली सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. अनुष्काने तिच्या आगामी ‘झिरो’ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, अनुष्का-विराटच्या इटलीतील लग्नसमारंभातील निवडक छायाचित्रे...  

बातम्या आणखी आहेत...