आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लगान\'ची 17 वर्षे : आता अशी दिसते फिल्मची Star Cast, हे कलाकार नाहीत या जगात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 2001मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर 'लगान' सिनेमाला रिलीज होऊन 17 वर्षे उलटली आहेत. 2001मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे 15 जून रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. सिनेमाशी निगडीत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कदाचित सिनेरसिकांना ठाऊक नसली. उदाहरणार्थ या सिनेमात 'गुरन' नावाचे पात्र साकारणारे अभिनेते राजेश विवेक आणि श्रीवल्लभ व्यास हे दोन कलाकार आता या जगात नाहीत. तसेच कॅप्टन एंड्र्यू रसेलचे पात्र वठवणारा ब्रिटीश अभिनेता आता 'गेंडा बचाओ कॅम्पेन'शी जुळला आहे.

 

सिनेमाचे अनेक कलाकार आता कुठे आणि कशात बिझी आहेत, तसेच गेल्या 17 वर्षांत त्यांच्या लूकमध्ये किती बदल झाला आहे, याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

ग्रेसी सिंह 

सिनेमातील भूमिकाः गौरी 

'लगान'नंतर 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि 'गंगाजल'सह अतिशय निवडक सिनेमांमध्ये ग्रेसी सिंहने काम केले. त्यानंतर ती छोट्या पडद्याकडे वळली. छोट्या पडद्यावरील 'संतोषी मां' या मालिकेत तिने काम केले . 'अमानत' या मालिकेतही ती झळकली. आता ग्रेसी सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवत असते.


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'लगान'च्या स्टारकास्टचे पूर्वी आणि आताचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...