आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाइमलाइटपासून दूर राहते श्रीदेवींची सावत्र मुलगी, हृतिक रोशनच्या कंपनीत केली नोकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आता या जगात नाहीत. त्यांच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी यांना सगळे ओळखतात. पण त्यांची एक सावत्र मुलगी असून तिच्याविषयी फारसे कुणाला ठाऊक नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांची सावत्र मुलगी कायम लाइमलाइटपासून दूर राहते. श्रीदेवी यांच्या या सावत्र मुलीचे नाव आहे अंशुला कपूर. अंशुला अभिनेता अर्जुन कपूरची धाकटी बहीण आहे. श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना शौरी यांची अंशुला आणि अर्जुन ही मुले आहेत. अंशुलाला चित्रपटांमध्ये रुची नाही, पण ती थिएटरमध्ये अॅक्टिव आहे. 


हृतिक रोशनच्या कंपनीत केली नोकरी...
25 वर्षीय अंशुलाने काही वर्षांपूर्वी अभिनेता हृतिक रोशनची कंपनी एचआरएक्समध्ये ऑपरेशन मॅनेजर म्हणून नोकरी केली होती. सध्या अंशुला तिच्या सावत्र बहिणी जान्हवी आणि खुशी यांची काळजी घेत आहे. श्रीदेवी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर काही युजर्सनी जान्हवी आणि खुशी यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता, तेव्हा अंशुला जान्हवी आणि खुशीच्या बाजुने उभी राहिली होती. 


अभ्यासात हुशार आहे अंशुला...
- अंशुला बॉलिवूडपासून दूर आहे. तिने न्यूयॉर्कच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.
- सलग तीन वर्षे तिने सर्टिफिकेट ऑफ मेरिट फॉर अकॅडमी एक्सीलन्स अवॉर्ड मिळवला आहे.
- नववी आणि दहावीत तिला हेड ऑफ मीडिल इयर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.
- 2007 मध्ये अंशुलाला कम्युनिटी सर्विस अवॉर्ड मिळाला होता. तिने रोमानियाच्या हाऊस बिल्डिंग प्रोजेक्टवरही काम केले आहे.
- अंशुलाने 2014 मध्ये एक्सीड एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एक वर्ष असोसिएट लिसनिंग अँड मर्चेंडिसिंग म्हणून काम केले आहे. ती गुगलचीही एम्प्लॉय राहिली आहे.


थिएटरवर केलंय काम...
चित्रपटांपासून दूर अंशुला रंगभूमीवर कार्यरत आहे. तिने The Night of January 16th, Oedipusa midsummer Night Dream, A Thousdand Cranes, Bhagwad Ajjukam सह अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. अंशुलाजवळ 49 लाख रुपयांची BMW X3 कार आहे. इतकेच नाही तर जुहूमध्ये तिचे स्वतःचे 3 BHK अपार्टमेंट असून त्याची किंमत सुमारे 5-6 कोटींच्या घरात आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, अंशुला कपूरचे निवडक Photos...  

बातम्या आणखी आहेत...