आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day:लग्नाअगोदरच प्रेग्नेंट झाली होती लिसा हेडन, बेबी बंप दाखवून दिली होती गोड बातमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: बॉलिवूडची हॉट अभिनेत्री लिसा हेडन आज तिचा 32वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. मुळची चेन्नईची असलेली लिसाने क्वीन, ए दिल है मुश्किल, शौकीन्स यांसारख्या हिंदी चित्रपटांतस काम केले आहे. 2016 साली लिसाने डिनो ललवानी या बिझनेसमनसोबत संसार थाटला आहे. विशेष म्हणजे लिसा ही लग्नाअगोदरच प्रेग्नेंट झाल्याची चर्चा होती.

लीसाने इन्स्टाग्रामवर एक बिकिनी फोटो पोस्ट करुन ती गर्भवती असल्याचे सांगितले होते. या फोटोला लीसाने कॅप्शन दिले, “Humble beginnings”.

 

2016 साली झाले होते लग्न...

लिसाने 29 ऑक्टोबर 2016 साली लिसा तिचा बॉयफ्रेंड डिनो ललवानी सोबत लग्नाच्या बंधनात अडकली होती. लिसाने इन्स्टाग्राम वर पोस्ट केलेल्या फोटोला चाहत्यांनी चागंलाच प्रतिसाद दिला आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील करण्यात आला आहे. इन्स्टाग्राम शेअर केलेल्या फोटोत लिसा निळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये बेबी बंप दाखवताना दिसते आहे.

 

मागील वर्षी दिला होता मुलाला जन्म...

लिसाने 17 मे 2017 साली मुलाला जन्म दिला. त्याने नाव झॅक ठेवले आहे.  लिसा तिच्या पतीसोबत आणि मुलासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

 

 

मुंबईत मॉडेलिंगमध्ये करियर करण्यासाठी येण्यापूर्वी ती ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथे वास्तव्यास होती. मॉडेलिंगनंतर तिने चित्रपटसृष्टीकडे धाव घेतली. डिनो हा पाकिस्तानी वंशाचे ब्रिटीश उद्योजक गुल्लू लालवानी यांचा मुलगा आहे. 2008 साली त्याने बिनॅटोन टेलिकॉम या त्याच्या वडिलांच्या कंपनीचे अध्यक्षपद स्वीकारले. याआधीही लिसाने आपल्या प्रियकरासोबतचे अनेक फोटो सोशल मिडीयावर शेअर केले होते.

 

या सिनेमांमध्ये झळकली लिसा..
लिसा अलीकडेच आलेल्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमात झळकली होती. ‘हाऊसफुल्ल 3’, ‘द शौकीन्स’, ‘क्वीन’, ‘रास्कल्स’ आणि ‘आयशा’, 'संता बंता प्राइवेट लिमिटेड' या सिनेमांमध्ये लिसाने काम केले आहे.

 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, नव-यासोबतचे लिसाचेकाही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...