आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day:थिएटरमध्येच झाली होती किरण-अनुपम यांची ओळख, विवाहीत असताना पडले होते प्रेमात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज अभिनेत्री तसेच राजकारणी किरण खेर त्यांचा ६२वा वाढदिवस साजरा करत आहेत. मुळच्या चंडीगढच्या असलेल्या किरण यांनी पूर्वी स्वत:ला थिएटरसाठी इतके वाहून घेतले होते, की त्यांनी 'मंडी' सिनेमातील एका भूमिकेसाठी श्याम बेनेगल यांना नकार दिला होता. उत्तम अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या किरण या विवाहीत असतानाच अनुपम खेर यांच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांनी पहिल्या पतीला घटस्फोट देत अनुपम यांच्यासोबत संसार थाटला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची ही खास लव्ह स्टोरी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

अशी झाली होती ओळख..
थिएटरमध्ये सोबत काम करत असताना अनुपम यांना किरणविषयी काहीच माहित नव्हते. परंतु किरण यांना अनुपम यांच्याविषयी सर्वकाही माहित होते. अनुपम हे आपल्याला पसंत करतात हेसुद्धा किरण यांना कळाले होते. त्यानंतर किरण मुंबईला आल्या आणि अभिनेता आणि बिझनेसमन गौतम बेरीसोबत लग्न केले. काही वर्षांनंतर किरण यांना वाटले, की त्या आयुष्यात आनंदी नाहीये. तेव्हा त्या एका मुलाची आई होत्या. अनुपमसुध्दा करिअरविषयी परेशान होते.

पुन्हा एकदा भेटले...
दोघांची पुन्हा एकदा भेट झाली आणि मैत्रीही झाली. यादरम्यान दोघे जेव्हा एका नाटकानिमित्त कोलकातामध्ये गेले, तेव्हा किरण यांनी पाहिले, की अनुपम यांनी एका सिनेमासाठी टक्कल केले होते. त्या अनुपम यांना आश्चर्याने पाहत होत्या. त्यानंतर अनुपम खोलीतून बाहेर आले आणि त्यांना किरण दिसल्या. ते किरणला बराच वेळ टक लावून पाहत होते. त्यांना काहीतरी म्हणायचे होते, परंतु म्हणू शकले नाही. काहीवेळानंतर किरण यांच्या खोलीचे दार वाजवले आणि सरळ म्हणाले, 'मला वाटते मी तुमच्यावर प्रेम करतो'. त्यानंतर दोघांचे नाते प्रेमात बदलले.

 

घटस्फोटानंतर केले लग्न
काही दिवसांनी किरण यांनी पतीला घटस्फोट देऊन अनुपम यांच्याशी लग्न केले. मागील तीस वर्षांपासून दोघे वैवाहिक आयुष्य जगत आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनुपम आणि किरण यांचे  फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...