आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः अभिनेता शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसह व्होग 'वोग न्यू बीएफएफ' या चॅट शोमध्ये सहभागी झाला होता. या शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री नेहा धुपिया करते. या चॅट शोमध्ये शाहिदने एक धक्कादायक खुलासा केला. तोसुद्धा आपल्या लग्नापूर्वीच्या रिलेशनशिपबद्दलचा. ‘इशारों इशारों’मध्ये शाहिद कपूर आपल्या ‘एक्स’बद्दल बोलून गेला. शोमध्ये नेहा धूपियाने शाहिदला त्याच्या लव्हलाईफबद्दल विचारले. तू कधी तुझ्या को-स्टारच्या प्रेमात पडला आहेस का? असा प्रश्न नेहाने शाहिदला विचारला. हा प्रश्न शाहिद शिताफीने टाळणार, असे वाटत असतानाच त्याने याला होकारार्थी उत्तर दिले. शाहिद म्हणाला, ''होय, एकदा नाही तर दोनदा मी माझ्या को-स्टारच्या प्रेमात पडलो. यापैकी एक तर आजही खूप लोकप्रिय आहे. पण तिने मला धोका दिला." आता शाहिदचा इशारा कुणाकडे होता, हे तुम्ही समजू शकता. होय, त्याचा इशारा कदाचित करीना कपूरकडे होता. शाहिद आणि करीनाच्या रिलेशनशिपच्या बातम्या एकेकाळी प्रचंड गाजल्या होत्या. मीरासोबत लग्न करण्यापूर्वी शाहिद तीन वर्षे करीनासोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघांची लव्ह स्टोरी 'फिदा' (2004) या चित्रपटाच्या सेटवर सुरु झाली होती. करीनानेच शाहिदला प्रपोज केले होते.
करीनाच्या अनेक मेसेज आणि फोन कॉल्सनंतर शाहिदने स्वीकारले होते लव्ह प्रपोजल...
- करीना आणि शाहिदची पहिली भेट 'फिदा' (2004) चित्रपटाच्या सेटवर झाली होती. शाहिदला पाहून करीना एवढी इम्प्रेस झाली होती, की तिनेच शाहिदला प्रपोज केले होते. करीनाने स्वतः काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत ही बाब मान्य केली होती.
- करीनाने सांगितले की, अनेकदा फोन आणि मॅसेज केल्यानंतर शादिहने तिचे प्रपोजल स्वीकारले होते.
- स्क्रीनवर दोघांच्या जोडीला काही कमाल करता आली नाही, पण त्यांच्या लव्ह लाईफची चांगलीच चर्चा झाली होती.
- करीनाने 2000 मध्ये डेब्यू केला होता. तर शाहिदने 2003 मध्ये. 2004 मध्ये फिदा या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. त्यावेळी करीना यशस्वी अॅक्ट्रेस समजले जात होते, तर शाहिदने नुकतेच पदार्पण केले होते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, शाहिद-करीनाच्या लव्ह स्टोरीशी संबंधित इतर काही बाबी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.