आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'या' चित्रपटानंतर विवाहीत संजय दत्तला 'साजन' मानायला लागली होती माधुरी, घरच्यांचा होता कडाडून विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सध्या सर्वत्र चर्चा आहे राजकुमार हिरानी यांच्या 'संजू' चित्रपटाची चर्चा झाली आहे. चित्रपटात संजय दत्तच्या 308 गर्लफ्रेंडविषयी सांगितले आहे. चित्रपटात टीव्हीची 'नागिन' करिश्मा तन्नाने माधुरीची भूमिका केली आहे. एक वेळ अशी होती की संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. या चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले होते संजय-माधुरी..

 

27 वर्षांपूर्वी 1991 साली दिग्दर्शक लॉरेंस डिसूजा यांनी साजन चित्रपटासाठी स्टारकास्ट निवडली. अगोदर चित्रपटात संजय दत्तच्या जागी आमिर खानला घेण्यात आले होते पण आमिरने नकार दिल्यानंतर हा चित्रपट संजय दत्तला मिळाला. तर अभिनेत्री म्हणून आएशा झुल्काची निवड झाली होती पण चित्रीकरणाअगोदर आएशा आजारी पडली आणि त्यानंतर माधुरीची त्याजागी वर्णी लागली.

साजन चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांची चांगलीच लोकप्रियता होती. चित्रपटानंतर संजय-सलमान चांगले मित्र बनले तर माधुरीसोबत संजयच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री लोकांना आवडली.  

 

संजय दत्त याअगोदरच विवादीत होता आणि माधुरी दीक्षितच्या घरचे या नात्यामुळे खुश नव्हते. पण तरीही माधुरीने हट्ट करत तिचे रिलेशनशीप सुरु ठेवले. त्यानंतर असे झाले की, 1993 साली बॉम्बब्लास्टमध्ये संजय दत्तचे नाव आले आणि तेव्हापासून माधुरी संजयपासून दूर झाली आणि या लव्हस्टोरीचा शेवट झाला.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'साजन' या चित्रपटातील काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...