आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • माधुरी दीक्षित, शाहरुख खान, Madhuri Dixit Shahrukh Khan Film Anjaam Completed 24 Years Of Release

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या अभिनेत्याच्या विरहात आजपर्यंत अविवाहित राहिली ही अभिनेत्री, आता करते हे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्पना अय्यर यांचा तारुण्यातील आणि लेटेस्ट फोटो, इनसेटमध्ये अमजद खान - Divya Marathi
कल्पना अय्यर यांचा तारुण्यातील आणि लेटेस्ट फोटो, इनसेटमध्ये अमजद खान

एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान स्टारर 'अंजाम' या चित्रपटाच्या रिलीजला 22 एप्रिल रोजी 24 वर्षे पूर्ण झाली. दिग्दर्शित राहुल रवैल यांचा हा चित्रपट 2 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला होता. तर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तब्बल नऊ कोटींचा गल्ला जमवला होता. चित्रपटात अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी जेल वॉर्डनची भूमिका साकारली होती. कल्पना अखेरच्या 1999 मध्ये आलेल्या 'हम साथ-साथ हैं' या चित्रपटात अखेरच्या झळकल्या होत्या. त्या ऐंशीच्या दशकातील प्रसिद्ध आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध असून अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायिका वठवली आहे. 


अभिनय सोडून आता या क्षेत्रात आहेत अॅक्टिव...  
- 1996 मध्ये रिलीज झालेल्या 'राजा हिंदुस्तानी' या सिनेमातील 'परदेशी...' या गाण्यात कल्पना अय्यर झळकल्या होत्या. 
- 1999मध्ये आलेल्या 'हम साथ साथ है' या सिनेमात झळकल्यानंतर कल्पना दुबईत स्थायिक झाल्या आणि आता ते त्या रेस्तराँ चालवतात.
- असे म्हटले जाते, की बॉलिवूड अभिनेते अमजद खानसोबत कल्पना अय्यर यांचे सूत जुळले होते. मात्र हे नाते पुढे जाऊ शकले नाही. अमजद खान यांच्या निधनानंतर कल्पना यांनी लग्न न करण्याच्या निर्णय घेतला आणि आज वयाच्या 63 व्या वर्षीही त्या अविवाहित आहेत. 
- एका मुलाखतीत कल्पना यांना त्यांच्या लग्नाविषयी विचारणा करण्यात आली होती. त्यावर त्या म्हणाल्या होत्या, की लग्न न करण्याचे मला दुःख नाही.
- पुढे त्या म्हणाल्या होत्या, ''मी लग्न का केले नाही, याचे उत्तर कुणालाही देऊ शकत नाही. कदाचित लग्न करण्याची माझ्यात हिंमत नव्हती. नाती जोडणे हे कष्टदायक आहे, असे मला वाटते. मात्र लग्न केले असते, तर किमान मी आई झाले असते.''

 

एकेकाळी मिस वर्ल्ड स्पर्धेत केले होते भारताचे प्रतिनिधित्व...  
- सत्तरच्या दशकात मॉडेलिंगद्वारे करिअरला सुरुवात करणारी कल्पना अय्यर 1978 साली मिस इंडिया स्पर्धेत फर्स्ट रनरअप ठरल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. टॉप 15 सेमी फायनलिस्टमध्ये त्यांनी स्थान पक्के केले होते. 
- याचकाळात त्यांना राजश्री प्रॉडक्शनच्या 'मनोकामना' या सिनेमाची ऑफर मिळाली होती. या सिनेमात त्या ग्लॅमरस रुपात झळकल्या होत्या.


बॉलिवूडमध्ये करणार कमबॅक... 
''चांगली भूमिका आल्यास निश्चित मी बॉलिवूडमध्ये कमबॅक करेल. माझे अॅक्टिंग करिअर संपलेले नाही. फक्त माझ्या कामाचे मी योग्य मानधन घेईल,'', असे कल्पना अय्यर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. 

 

पुढील स्लाईड्समध्ये वाचा 'अंजाम' या चित्रपटाशी निगडीत काही खास गोष्टी...  

बातम्या आणखी आहेत...