आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश मांजरेकरांच्या मुलीला लाँच करतोय सलमान, \'दबंग-3\' मध्ये दिसणार मराठमोळी अभिनेत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खानने आपला मित्र अनिल कपूरची मुलगी सोनम आणि शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षीसोबत चित्रपटांमध्ये रोमान्स केला आहे. त्याने 2010 मध्ये 'दबंग' चित्रपटातून सोनाक्षी सिन्हाला बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला होता. आता 8 वर्षांनंतर सलमान या चित्रपटाच्या तिस-या भागात अजून एका न्यू कमरला ब्रेक देणार आहे. फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार 'दबंग-3' मधून सलमान खान महेश मांजरेकांची मुलगी अश्वामी मांजरेकरला लॉन्च करणार आहे. मेकर्सला सोनाक्षीसोबत अजून एक अभिनेत्री हवी आहे. पहिले वृत्त होते की, मौनी रॉय चित्रपटात असणार आहे. पण तिने एका मुलाखतीत स्पष्ट सांगितले की, ती 'दबंग-3' चा भाग असणार नाही. लेटेस्ट अपडेटनुसार अश्वामी या चित्रपटाचा भाग बनणार नाही.


सलमानचे मित्र आहेत महेश मांजरेकर...

- खुप कमी लोकांना माहिती असेल की, महेश आणि सलमान एकमेकांचे जवळचे मित्र आहेत.
- जेव्हा सलमानला कळाले की, महेश यांच्या मुलीला बॉलिवूडमध्ये काम करायचे आहे तेव्हा त्यांनी तिला 'दबंग-3' मध्ये घेण्याची प्लानिंग केली.
- अश्वामीच्या भूमिकेविषयी अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण वृत्त आहे की, तिची भूमिका सोनाक्षीच्या बरोबरीनेच असेल.

 

कोण आहे अश्वामी

- अश्वामी ही महेश मांजरेकरांची पहिली बायको दीपाची मुलगी आहे. अश्वामीला एक भाऊ आहे, त्याचे नाव सत्या आहे.
- महेशने दूसरे लग्न मेधा मांजरेकरसोबत केले आहे. त्यांना एक मुलगी सई आहे. अश्वामीचा जन्म 29 ऑगस्ट, 1988 मध्ये झाला. ती सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह आहे.
- अश्वामीने आपले प्रोडक्शन हाउस ओपन केले आहे. ज्याचे नाव अश्वामी फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड असे आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वामीचे PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...