Home | Gossip | Malaika Arora And Priyanka Chopra Stretch Marks

​मलायकापासून ते प्रियांकापर्यंत, Stretch Marks दाखवण्यात लाज बाळगत नाहीत या 6 अभिनेत्री

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 12, 2018, 12:21 AM IST

सिनेसृष्टीतील टफ कॉम्पिटीशन आणि कथेच्या मागणीनुसार निर्माते-दिग्दर्शक कलाकारांना कधी वजन कमी करायला लावतात, तर कधी ते व

 • Malaika Arora And Priyanka Chopra Stretch Marks

  मुंबईः सिनेसृष्टीतील टफ कॉम्पिटीशन आणि कथेच्या मागणीनुसार निर्माते-दिग्दर्शक कलाकारांना कधी वजन कमी करायला लावतात, तर कधी ते वाढवायला सांगतात. जर अभिनेत्रींविषयी बोलायचे झाल्यास, त्यांना वजन कमीजास्त करण्यासोबतच गर्भावस्थेतूनही जावे लागते. या कारणांमुळे अभिनेत्रींच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स येतात. कधी पोटावर तर कधी हातांवर दिसणारे हे स्ट्रेच मार्क्स दिसू नये, असेच सर्वांना वाटत असते. पण बॉलिवूड अभिनेत्री हे स्ट्रेच मार्क्ससुद्धा कॉन्फीडेंटली दाखवताना दिसतात.


  बोल्डनेससोबतच स्ट्रेच मार्क्स दाखवताना दिसते मलायका..
  बोल्ड अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी 44 वर्षीय अभिनेत्री मलायका अरोरा फिटनेसमुळेही कायम चर्चेत असते. अतिशय ग्लॅमरस आणि बिनधास्त अशी ही अभिनेत्री आहे. एका मुलाची आई असलेल्या मलायकाच्या पोटावर डिलिव्हरीनंतर बरेच स्ट्रेच मार्क्स आले. पण मलायका कधीही याविषयी लाज बाळगत नाही. डिझायनर आउटफिट्समध्ये मलायका अतिशय आत्मविश्वासाने वावरताना दिसते. अनेकदा या आउटफिट्समधून तिच्या पोटावर पडलेले स्ट्रेच मार्क्स स्पष्ट दिसत असतात. केवळ मलायकाच नव्हे तर बॉलिवूडमध्ये अशा आणखी काही अभिनेत्री आहेत, ज्या बिनधास्तपणे स्ट्रेच मार्क फ्लॉन्ट करताना दिसतात.

  जाणून घेऊयात या अभिनेत्रींविषयी पुढील स्लाईड्सवर...

 • Malaika Arora And Priyanka Chopra Stretch Marks

  परिणीती चोप्रा

   

  परिणीती सोशल मीडियावर सक्रिय राहते आणि नेहमी आपले फोटोदेखील पोस्ट करते. काही महिन्यांपूर्वी तिने एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिच्या पोटावर काही स्ट्रेच मार्क्स दिसले होते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर एकीकडे तिला ट्रोल केले गेले. तर दुसरीकडे काहींनी तिला स्ट्रेच मार्क्स दाखवल्याबद्दल शूर म्हणत लग्नाचे प्रस्तावही पाठवले होते. एका यूजरने लिहिले होते की, मला परीसारखी मुलगी पाहिजे. दुसऱ्याने लिहिले, रियल बॉडी दाखवण्यासाठी परी तुझे आभारी आहोत. 

 • Malaika Arora And Priyanka Chopra Stretch Marks

  परिणीती चोप्रा 
   

  परिणीतीने पहिल्यांदाच स्ट्रेच मार्क्स दाखवलेत असे नाही. ती कधीच स्ट्रेच मार्क्समुळे न्युनगंड बाळगत नाही. परिणीती एकेकाळी लठ्ठ होती. पण फिटनेसकडे विशेष लक्ष देऊन ती आता स्लिम झाली आहे. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान तिच्या शरीरावरदेखील स्ट्रेच मार्क्स आले आहेत. लठ्ठपणामुळे परिणीतीच्या ब्रेस्ट आणि आर्म्सवर आलेले स्ट्रेच मार्क स्पष्ट दिसतात.  

 • Malaika Arora And Priyanka Chopra Stretch Marks

  प्रियांका चोप्रा 
   

  प्रियांका चोप्राची गणना बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रींमध्ये होते. मात्र फुडी असल्याने तिचे वजन कमीजास्त होत असते. याच कारणामुळे तिच्या थायवर स्ट्रेच मार्क  आले. पण बिकिनी परिधान केल्यानंतर प्रियांका हे स्ट्रेच मार्क दाखवण्यात लाज बाळगत नाही. स्ट्रेच मार्कविषयी टेन्शन न बाळगण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे करिअरच्या सुरुवातीच्या काळात प्रियांकाला सावळ्या रंगामुळे बरीच टीका सहन करावी लागली होती. एकेकाळी सावळी म्हणून लोक तिची टिंगल उडवायचे. पण आत्मविश्वासाच्या बळावर प्रियांका बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बनली. कदाचित यामुळेच तिला सावळ्या रंगासोबत स्ट्रेच मार्कमुळे काही फरक पडत नाही.  

 • Malaika Arora And Priyanka Chopra Stretch Marks

  जरीन खान
   

  एकेकाळी जरीन खानसुद्धा बरीच लठ्ठ होती. याच कारणामुळे तिच्या आर्मवर फॅटमुळे स्ट्रेच मार्क आले. 2005 साली 100 किलो वजन असलेल्या जरीनने अभिनेत्री होण्याचा विचार स्वप्नातसुद्धा केला नव्हता. पण 2010 मध्ये तिला सलमान खानसोबत ‘वीर’ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोन करण्यासाठी जरीनने 30 किलो वजन कमी करुन स्वतःला फिट बनवले. याकाळात फॅटमुळे तिच्या शरीरावरदेखील स्ट्रेस मार्क आले. पण ही अभिनेत्रीसुद्धा कधीही हे स्ट्रेच मार्क दाखवण्यात लाज बाळगत नाही. 

 • Malaika Arora And Priyanka Chopra Stretch Marks

  चित्रांगदा सिंह
   

  चित्रांगदा सिंहची गणनासुद्धा बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींमध्ये होते. तिच्या टमीवरदेखील बरेच स्ट्रेच मार्क्स आहेत. चित्रांगदा एका मुलाची आई आहे. गर्भावस्थेच्या काळात हे स्ट्रेच मार्क तिच्या पोटावर आले होते. लो वेस्ट ड्रेसेसमधून तिच्या पोटावरील स्ट्रेच मार्क स्पष्ट दिसतात. पण त्याकडे दुर्लक्ष करत चित्रांगदा डिझायनर आउटफिट परिधान करुन रॅम्पवर आत्मविश्वासाने वावरताना दिसते.  

   

 • Malaika Arora And Priyanka Chopra Stretch Marks

  सोनाक्षी सिन्हा

   

  बॉलिवूड करिअरच्या सुरुवातीच्या काळात सोनाक्षी बरीच लठ्ठ होती. सलमान खान स्टारर 'दबंग' या सिनेमाची ऑफर मिळाल्यानंतर सोनाक्षीने तिचे 30 किलो वजन कमी केले होते. पूर्वी तिचे वजन तब्बल 90 किलो होते. अतिलठ्ठपणामुळे तिच्या आर्मवर आलेले स्ट्रेच मार्क्स आजही दिसतात. पण सोनाक्षी हे स्ट्रेच मार्क दाखवण्यात लाज बाळगत नाही.

Trending