आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिशय ग्लॅमरस आहे साऊथची मलायका अरोरा, चित्रपटांमध्ये केले आहेत आयटम नंबर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद/मुंबई -  बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम नंबरसाठी प्रसिद्ध असलेल्या मलायका अरोराची हुबेहुब कॉपी आहे दाक्षिणात्य अभिनेत्री हिना पांचाल. मलायका अरोराच्या चेह-याशी हुबेहुब साधर्म्य साधत असल्याने हिनाला साऊथ चित्रपटांमधील मलायका अरोरा असेही म्हणतात. हिना सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे अनेक हॉट आणि ग्लॅमरस फोटोज बघायला मिळतात. 


मलायकासोबत चेहरा, फिगर मॅच करत असल्यावरुन ती म्हणते, "मी खूप लकी आहे की माझे लुक्स मलायका अरोरा यांच्यासारखे आहेत." 2015 साली फोर्ब्स इंडियाच्या टॉप-100 सेलिब्रिटीमध्ये हिनाला स्थान मिळाले होते. 


हिनाने केले आहे आयटम साँग्स...
- हिनाने आतापर्यंत अनेक चित्रपटात आयटम साँग्स केले आहेत. त्यात 'मोहल्ले में हुक्का', 'बेवडा-बेवडा', 'बेबो-बेबो', 'राजू ओ राजू', 'टकमक-टकमक' आणि 'बलम बंबई' यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.


या चित्रपटांत केले आहे हिनाने काम...
हिनाने अनेक बॉलिवूड, तामिळ आणि तेलुगु चित्रपटात काम केले आहे. तिने हम हैं तीन खुराफाती (2014), लाइफ में ट्विस्ट है (2014), जस्ट गम्मट (2015), मिस टनकपुर हाजिर हों (2015), लोड्डे (2015), रत्न मंजरी (2015), यगावरयिनुम ना काक्का (2015), बाबूजी एक टिकट बम्बई (2016) यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.


पुढच्या स्लाईडवर पाहा, मलायकासारखी हुबेहुब दिसणाऱ्या हिना पांचालचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...