आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साऊथ अॅक्ट्रेसच्या लग्नाचे हे NEW PICS पाहिलेत का तुम्ही! नववधूच्या रुपात खुलले सौंदर्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री भावना मेनन सोमवारी दिग्दर्शक नवीन कृष्णनसोबत विवाहबद्ध झाली. केरळमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडला. केरळ येथील जवाहरलाल कन्वेंशन सेंटर कोवईलाकम रेसिडेंसी तृशूर येथे हे लग्न झाले. भावनाच्या लग्नाचे काही नवीन फोटोज समोर आले आहेत. नववधुच्या रुपात नखशिखांत नटलेली भावना अतिशय सुंदर दिसतेय. लग्नात तिने गोल्डन कलरची साडी आणि पारंपरिक दागिने घातले होते. भावनाचे भाऊ जयदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडले. या लग्नात कुटुंबीय आणि काही जवळचे नातेवाईक सहभागी झाले होते.

 

भावना मेनन आणि नवीन यांचे वेडिंग रिसेप्शन 22 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता जवाहरलाल कन्वेशन सेंटर येथेच आयोजित करण्यात आले होते. गेल्यावर्षी मार्च महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. शनिवारी रात्री भावनाची मेंदी सेरेमनी झाली. याचेही काही फोटोज समोर आले आहेत. या फोटोजमध्ये भावना तिच्या बेस्ट फ्रेंड्ससोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. मेंदी सेरेमनीत भावनाने यलो कलरचा गाऊन घातला होता.


पुढील स्लाईड्सवर बघा, भावना आणि नवीन यांच्या लग्नाचे नवीन फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...