आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुस-यांदा प्रेमात पडली ही अॅक्ट्रेस, नव-याला सोडून या व्यक्तीशी थाटले दुसरे लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्या उन्नी आणि अरुण कुमार - Divya Marathi
दिव्या उन्नी आणि अरुण कुमार

मुंबई/कोच्ची: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री (मल्याळम) दिव्या उन्नीने रविवारी मुंबई बेस्ड इंजिनिअर अरुण कुमारसोबत लग्न थाटले. दोघांनी अमेरिकेतील ह्यूस्टन येथे श्री गुरुवायरप्पन मंदिरात लग्न केले. लग्नाचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या लग्नात दोघांच्या कुटुंबीयांसह काही जवळचे मित्र सहभागी झाले होते. 


पहिल्या नव-याला दिला आहे घटस्फोट... 
- दिव्याचे पहिले लग्न 2002 मध्ये झाले होते. त्याकाळात दिव्याचे करिअर यशोशिखरावर होते. डॉ. सुधीर शेखर हे तिच्या पहिल्या नव-याचे नाव असून लग्नानंतरक दिव्या अमेरिकेत स्थायिक झाली होती.
- दिव्या आणि सुधीर यांच्यातील मदभेद टोकाला गेल्याने 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 
- पहिल्या लग्नापासून दिव्याला अर्जुन आणि मीनाक्षी ही दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर दिव्या दोन्ही मुलांना घेऊन अमेरिकेहून कोच्चीला परतली.


अमेरिकेत चालवते डान्स स्कूल...
- दिव्याने 'अमेरिकन जलाकम'द्वारे टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले. याशिवाय ह्यूस्टन येथे तिचे 'श्रीपदम्' स्कूल ऑफ आर्ट्स या नावाने डान्स स्कूल आहे.
- दिव्या भरतनाट्यम, कुचिपुडी आणि मोहिनअट्टम या नृत्य प्रकारांमध्ये तरबेज आहे. तिच्या डान्सिंग स्कूलची एक ब्रॅण्च कोच्चीत आहे.
- दिव्याने डान्स स्कूल चालवू नये, असे तिच्या पहिल्या पतीचे म्हणणे होते. पण दिव्या तिच्या निर्णयावर ठाम राहिली. त्याचा परिणाम म्हणजे तिचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आले. 
- घटस्फोटाच्या दोन वर्षांनी दिव्याने इंजिनिअर अरुण कुमारसोबत लग्नाचा निर्णय घेतला.


मोठ्या अभिनेत्यांसोबत दिव्याने केले आहे काम...
दिव्या ही अभिनेत्री मीरा नंदन आणि रेम्या नम्बीसन यांची कजिन आहे. दिव्याने मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. ममूटी, मोहनलाल, दिलीप आणि सुरेश गोपी या मोठ्या स्टार्ससोबत दिव्याने काम केले आहे. तामिळ, तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये दिव्या झळकली आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, दिव्या आणि अरुण कुमार यांच्या लग्नाचे निवडक PHOTOS... 

बातम्या आणखी आहेत...