आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घायाळ नजरेेने हृदयाचा ठोका चुकवणारी प्रिया आहे उत्कृष्ट गायिका, बघा तिची Instagram Diary

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘उरू अदार लव्ह’ या चित्रपटातील ‘मनिक्य मलरया पूवी’ हे गाणे रिलीज झाले आणि  प्रिया प्रकाश  ही नवोदित अभिनेत्री एका रात्रीतून स्टार झाली आहे.  या गाण्यामुळे प्रिया अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवून गेली आहे.  मल्ल्याळम भाषेची गोडी असणाऱ्या या गाण्यात अवघ्या काही सेकंदांसाठी प्रियाची झलक दिसत असून तिच्या डोळ्यांवर आणि खोडकर हसण्यावर तरुणांचे भान हरपले आहे. महत्त्वाचे म्हणजे 'मिड डे’ने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार या चित्रपटासाठी प्रियाची सहाय्यक अभिनेत्री म्हणून निवड करण्यात आली होती. पण कालांतराने अभिनय कौशल्य पाहून मुख्य भूमिकेसाठी तिची वर्णी लागली आहे. 

 

उत्कृष्ट गायिका आहे प्रिया...

- प्रिया एक उत्कृष्ट गायिकासुद्धा आहे. गोड गळा असलेल्या प्रियाचे गातानाचे अनेक व्हिडिओज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बघायला मिळत आहेत.

- प्रियाचा हा डेब्यू चित्रपट असून येत्या  3 मार्च 2018 रोजी रिलीज होतोय. 

 - 18 वर्षीय प्रिया मुळची केरळची असून थ्रिसूरच्या विमला कॉलेज येथून ती बी कॉमचे शिक्षण घेत आहे.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, एका रात्रीतून स्टार झालेल्या प्रियाची इन्स्टाग्राम डायरी... 

बातम्या आणखी आहेत...