आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: ही मराठमोळी मुलगी अशी बनली कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, गँगस्टरसोबत लग्न केल्याची चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ममता कुलकर्णीचे पुर्वीचे आणि लेटेस्ट रुप, इनसेटमध्ये ममताचा तथाकथित पती विकी गोस्वामी - Divya Marathi
ममता कुलकर्णीचे पुर्वीचे आणि लेटेस्ट रुप, इनसेटमध्ये ममताचा तथाकथित पती विकी गोस्वामी

एन्टरटेन्मेंट डेस्कः नव्वदच्या दशकात आपल्या बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकणा-या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी. 20 एप्रिल 1972 रोजी मुंबईत एका मराठी कुटुंबात जन्मलेली ममता आज आपला 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'डोंगा पुलिस' या तेलगू सिनेमाद्वारे ममताने अभिनयाचा श्रीगणेशा केला. दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी ममताला 'तिरंगा' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी दिली. 1993 मध्ये रिलीज झालेला 'आशिक आवारा' हा सिनेमा ममताच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा ठरला. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा बोल्ट न्यू फेस अवॉर्डसुद्धा मिळाला.

 

करिअर यशोशिखरावर असताना निघून गेली होती अज्ञातवासात..

करिअर यशोशिखरावर असताना ममता अचानक अज्ञातवासात निघून गेली. परतली ती चक्क साध्वीच्या रुपात... सिनेसृष्टीला रामराम ठोकल्यानंतर तब्बल 16 वर्षांनंतर ममता साध्वीच्या रुपात मीडियासमोर आली. या मधल्या काळात आपण आध्यात्माकडे वळल्याचे तिने सांगितले. पण याचकाळात ममताने गँगस्टर विकी गोस्वामीसोबत लग्न केले आणि त्याचा अंमली पदार्थांचा व्यवसाय ती सांभाळू लागली, अशीही चर्चा रंगली.

 

गेल्यावर्षी निघाले होते अजामीनपात्र वॉरंट...

विशेष म्हणजे गेल्यावर्षी ड्रगच्या तस्करीप्रकरणी ममता आणि तिचा कथित पती विकी गोस्वामीविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. ठाणे पोलिसांनी 2016 मध्ये सोलापुरात आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करांचा पर्दाफाश केला होता. जवळपास 2000 कोटी रुपयांची इफेड्रिन पावडर (ड्रग) पोलिसांनी जब्त केली होती. त्यात विकी गोस्वामी आणि ममता कुलकर्णीचा सहभाग असल्याचे समोर आले होते. ड्रग केनिया पाठवण्यात येणार होते. याप्रकरणी कोर्टाने ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीविरोधात वॉरंट जारी केला होता. आता ममता देशाबाहेर असल्याचे समजते. 

 

आज ममताच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात, बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कशी बनली आणि तिची गँगस्टर विकी गोस्वामीसोबत कशी झाली होती ओळख... यासह बरंच काही..  

बातम्या आणखी आहेत...