आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 19 व्या वर्षी भाग्यश्रीला मिळाला आयुष्याचा जोडीदार, विशीतच या Celebs झाले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता सलमान खानसोबत 'मैंने प्यार किया' या सिनेमाद्वारे डेब्यू करणारी अभिनेत्री भाग्यश्री हिने वयाची 49 वर्षे पूर्ण केली आहेत. सिनेमांसोबतच काही टीव्ही शोजमध्येही ती झळकली आहे. भाग्यश्रीचा जन्म 23 फेब्रुवारी 1969 ला शाही पटवर्धन कुटुंबात झाला. तिचे पूर्ण नाव राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन आहे. सांगलीचे राजा श्रीमंत विजयसिंहराव माधवराव पटवर्धन यांची ती मुलगी आहे. 


1989 मध्ये रिलीज झालेल्या 'मैंने प्यार किया' या सिनेमाने भाग्यश्रीला एका रात्रीत स्टारपद बहाल केले. भाग्यश्रीने सिनेमापूर्वी कच्ची धूप, होनी अनहोनी आणि किस्से मियां बीबी के या मालिकांमध्ये अभिनय केला होता. मात्र सुपरस्टारची इमेज भाग्यश्री फार काळ जपू शकली नाही. आपल्या कुटुंबाला प्राधान्य देत भाग्यश्रीने यशस्वी करिअरवर पाणी सोडले. 


वैवाहिक जीवनः

भाग्यश्रीने वयाच्या 19व्या वर्षी तिचा बालपणीचा मित्र हिमालय दसानीसोबत लग्न केले. लग्नानंतर तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला नव्हता. केवळ पतीसोबतच सिनेमात काम करेल, अशी अट तिने ठेवली होती. मात्र दिग्दर्शकांना भाग्यश्रीची मागणी पटली नाही. त्यामुळे तिचे करिअर ठप्प झाले.  भाग्यश्रीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अवंतिका आणि अभिमन्यू ही त्यांची नावे आहेत. भाग्यश्री आपल्या पतीला त्याच्या व्यवसायात मदत करते. 

 

कमी वयात लग्न थाटणा-या भाग्यश्रीचे फिल्मी करिअर यशस्वी ठरले नाही. मात्र सिनेसृष्टीत असे काही कलाकार आहेत, ज्यांनी कमी वयात लग्न थाटले आणि लग्नानंतर त्यांचे फिल्मी करिअर यशोशिखरावर पोहोचले.   पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशा सेलिब्रिटींविषयी, ज्यांनी लग्नानंतर फिल्मी करिअरमध्ये यशोशिखर गाठले... 

बातम्या आणखी आहेत...