आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 व्या वर्षी लग्न 34 मध्ये घटस्फोट, 3 मुलांची आई असूनही याला डेट करतेय 'बेबी डॉल' सिंगर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कणिका तिच्या मुलांसोबत आणि एकीकडे आदित्य - Divya Marathi
कणिका तिच्या मुलांसोबत आणि एकीकडे आदित्य

गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की, 'बेबी डॉल' फेम सिंगर कणिका कपूर एका व्यक्तीला डेट करतेय. या दोघांचा फोटो नुकताच समोर आलाय. या फोटोमध्ये शोभा डेचा मुलगा आदित्य किलाचन्द दिसतोय. तिने आदित्यचा फोटो शेअर करत'Always in action @adityak77'असे कॅप्शन टाकलेय. कणिका आणि आदित्य दिर्घकाळापासून एकमेकांना ओळखतात. यासोबतच हे दोघ फ्रान्समध्ये क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी गेले होते.

 

3 मुलांची आई आहे कणिका
कणिका 3 मुलांची आई आहे. ती सिंगल मदर बनून मुलांचा सांभाळ करतेय. 1997 मध्ये वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी कणिकाचे लग्न NRI बिझनेसमॅन राज चंडोकसोबत झाले होते. मात्र 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्न मोडल्याविषयी कणिकाने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की, पहिल्या लग्नाच्या वेळी खुप घाई केली होती. तिने सांगितले की, "मी एका व्यक्तीला भेटले, प्रेम झाले आणि लग्न झाले. मला वाटते की, ही माझी चुक होती. वैवाहिक जीवनाचे काही क्षण मी एन्जॉय केले. परंतू इतर गोष्टींविषयी मला बंधनात असल्यासारखे वाटायचे. या काळात मी मेंटल टॉर्चर झाले आणि डिप्रेशनमध्ये गेले. वयाच्या 25 व्या वर्षी मी तिस-या मुलाला जन्म दिला. यामुळे माझ्या करिअरला काही स्पेस नव्हता. 2012 मध्ये माझा घटस्फोट झाला आणि मी लंडनमध्ये मुलांसोबत एकटे राहण्याचा निर्णय घेतला. या काळात मी काही नवीन गाण्यांच्या शोधात होते."


वयाच्या 8 वर्षांपासून शिकत होते संगीत
वयाच्या 8 वर्षांपासूनच मी पंडित गणे प्रसाद मिश्रा यांच्याकडून क्लासिकल म्यूझिकचे धडे गिरवणे सुरु केले. 12 व्या वर्षी ऑल इंडिया रेडिओवर परफॉर्म केले. अनूप जलोटा यांच्यासोबत भजनही गायले. 'सारेगामा' या रियालिटी शोसाठी त्यांना रेकॉर्डिंग पाठवल्या होत्या. परंतू मला रिजेक्ट करण्यात आले होते. कणिका सांगते की, माझ्या कुटूंबात संगीताचा गंधही नव्हता. बिझनेस हे माझे फॅमिली बॅकग्राउंड आहे. म्यूझिक करिअर बनवणारी मी माझ्या कुटूंबातील पहिली व्यक्ती आहे.


लग्नाची काहीच घाई नाही
आदित्यसोबत लग्न करण्याविषयी कणिका सांगते की, आम्हा दोघांना लग्नाची काहीच घाई नाही. दोघांना एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायची इच्छा आहे. कणिका सांगते की, आदित्यची फॅमिली मला पुर्ण सपोर्ट करते आणि मला त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीसारखे मानते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कणिका-आदित्य आणि मुलांचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...