आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाग्यश्रीचे दोन 'अनमोल रतन': मुलाला करणार फिल्म इंडस्ट्रीत लाँच, लंडनमध्ये शिकतेय मुलगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मैनें प्यार किया' या सिनेमातून एका रात्रीत स्टार झालेली अभिनेत्री भाग्यश्री हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 49 वर्षे पूर्ण केली आहेत. वयाच्या पन्नाशीत पोहोचलेल्या भाग्यश्रीच्या चेह-यावर वाढत्या वयाचा मुळीच परिणाम झालेला दिसत नाही. या वयातही तिचा ग्लॅमरस अंदाज तरुण मुलींना लाजवणारा आहे. भाग्यश्रीने सिनेसृष्टीला रामराम ठोकला असून ती आपल्या खासगी आयुष्यात बिझी आहे. भाग्यश्री एक मुलगा आणि एका मुलीची आई आहे. तिच्या मुलांनी आता तारुण्यात पदार्पण केले आहे. तिचा मुलगा अभिमन्यू आता 27 वर्षांचा झाला असून लेक अवंतिका 22 वर्षांची आहे. 


भाग्यश्रीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात तिच्या लाडक्या मुलांविषयी आणि सोबतच पाहुयात अभिमन्यू आणि अवंतिकाची खास छायाचित्रे... 

 

मुलाला करणार आहे फिल्म इंडस्ट्रीत लाँच... 
भाग्यश्री तिचा मुलगा अभिमन्यूचे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाग्यश्रीचा मुलगा आता 27 वर्षांचा झाला आहे. सूत्रांनुसार, भाग्यश्रीने आपल्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच करण्यासाठी सलमान खानजवळ मदत मागितली आहे. याअगोदर सलमानने अर्जुन कपूर, कतरिना कैफ, पुलकित सम्राट, बिलाल अमरोहीसारख्या अनेक नवीन कलावंतांना बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मदत केली आहे. यामधील बहुतांश आज यशस्वी अभिनेते म्हणून नावारूपास आले आहेत. त्यामुळे भाग्यश्रीदेखील सलमानच्या या गुड लकचा वापर आपल्या मुलासाठी करणार असे दिसत आहे.

 

याबाबत सलमानने भाग्यश्रीने मागितलेल्या मदतीसाठी होकार कळवला आहे. शिवाय त्याने अभिमन्यूला व्यायाम करून शरीरयष्टी बनवण्याचा सल्लाही दिला आहे. अभिमन्यू सध्या डान्स, अॅक्टिंग आणि अॅक्शनचे प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वी रोहन सिप्पीच्या ‘दम मारो दम’ या सिनेमासाठी अभिमन्यूने सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्याने ली स्ट्रॉसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूट आणि अनुपम खेर यांच्या चित्रपट संस्थेतून अँक्टिंगचा कोर्स केला आहे. अभिमन्यू आणि टायगर श्रॉफ चांगले मित्रदेखील आहेत.

 

लंडनमध्ये शिकतेय अवंतिका
भाग्यश्रीची लाडकी लेक अवंतिका आता 22 वर्षांची झाली असून ती लंडनच्या Cass बिझनेस स्कूलमध्ये बिझनेस आणि मार्केटिंगची डीग्री घेत आहे. अवंतिकाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर हे स्पष्ट होते की, तिला ट्रॅव्हलिंग, डान्सिंग, फॅशन आणि मित्रांबरोबर पार्टी एन्जॉय करायला आवडते. अवंतिकासुद्धा तिच्या आईप्रमाणे ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर अवंतिका अॅक्टिव असते. 


पुढील स्लाईड्सवर बघा, भाग्यश्रीच्या दोन्ही मुलांची खास छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...