Home »Gossip» Meet Nery Singh The Actress Of Kaalakaandi Was Once A Man

'कालाकांडी'मधील ही अभिनेत्री कधीकाळी होती मुलगा, या कारणामुळे घेतला मुलगी बनण्याचा निर्णय

दिव्य मराठी वेब टीम | Jan 12, 2018, 11:16 AM IST

मुंबई - सैफ अली खानचा चित्रपट 'कालाकांडी' सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री नेरी सिंहने मुख्य भूमिका केली आहे. पण फार कमी जणांना माहीत आहे की नेरी सिंह कधीकाळी मुलगा होती आणि तिचे नाव नरेंद्र सिंह होते. असे काय घडले की नेरीने मुलगी होण्याचा निर्णय घेतला याचा खुलासा नेरीने नुकताच आमच्या प्रतिनीधीशी बोलताना केला. वाचा काय म्हटली नेरीने...

नेरीने सांगितले की, मी डान्सर म्हणून शोमध्ये हिस्सा घेत असे पण तो डान्स मी महिलांप्रमाणे एन्जॉय करत असे. कधीकधी मी मुलींचे कपडे घालून डान्स करत असे आणि तेव्हा मला समजले की मला जास्त अटेंशन मिळत आहे. तेव्हा मला कळाले की मी मुलगा असून मुलींप्रमाणे नव्हे तर त्यांच्यापेक्षाही उत्तमप्रकारे डान्स करत असे.


एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा मध्ये केला डान्स परफॉर्मन्स...
नेरी सांगते, मी मुलाच्या रुपात असताना 'एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा' मध्ये परफॉर्म केले होते. पण मी नॅशनल टेलिव्हीजनवर मुलगी बनून डान्स करणार नाही असे सांगितले. जेव्हा फराह खानने या शोमध्ये हस्तक्षेपल करण्यास सुरुवात केली तेव्हा मी हा शो सोडणार होती. चॅनलने फराहला मला कन्विन्स करण्यासाठी पाठवले. जेव्हा इतकी मोठी फिल्ममेकरने माझ्या कामाचे कौतुक केले तेव्हा मी नाही म्हणू शकले नाही. तो एपिसोड हिट झाला आणि यानंतर सोनी टीव्हीने अनेकदा मला शोमध्ये परफॉर्म करण्यासाठी बोलवले.

- महिलेच्या रुपात नेरी हिट झाली आणि तिने मुलगी बनण्याचा निर्णय घेतला. 'एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा'नंतर नेरीने बॉलिवूडमध्ये 'डून्नो व्हाय2...लाइफ इज अ मोमेंट', 'तमाशा' आणि 'मॉम' चित्रपटात काम केले आहे.

असा मिळाला तमाशा चित्रपट...

नेरीने सांगितले की, कास्टींग डायरेक्टर मुकेश छाबडा टीम मेंबरने तिला ऑडिशनसाठी बोलवले. यानंतर एका महिन्यानंतर तिला ऑफिसमधून फोन आला आणि मुकेश छाबडाने नेरीला 'तमाशा'मध्ये हिजड्याचाही रोल केला. पहिले तर तिने या रोलसाठी नकार दिला होता पण जेव्हा तिला कळाले की चित्रपटात रणबीर कपूर आहे तर तिने या भूमिकेसाठी होकार दिला.

पुढच्या स्लाईडवर पाहा, नेरी सिंहचे काही खास PHOTOS...

Next Article

Recommended