आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Meet Sanjay Dutt Niece And His Other Family Members संजू, संजय दत्तचे कुटुंबीय

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे संजय दत्तची भाची, जाणून घ्या बहीणभावंडांसोबत इतर फॅमिली मेंबर्सविषयी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता संजय दत्तच्या खासगी आयुष्यावर बेतलेल्या 'संजू' या हिंदी चित्रपटाचा टीजर 24 एप्रिल रोजी रिलीज झाला. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे. 29 जुलै 1959 रोजी सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या घरी जन्मलेल्या संजयने केवळ बॉलिवूडच नाही तर पूर्ण जगभरात नाव कमवले. संजय दत्तचे आई-वडील आणि सख्ख्या बहिणींविषयी तर सर्वांनाच माहीत आहे पण त्याच्या इतर कुटुंबियांविषयी फारच कमी जणांना माहीत आहे. संजय दत्तला दोन बहिणी आहेत. नम्रता आणि प्रिया. नम्रताचे लग्न दिवंगत अभिनेते राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरवसोबत झाले आहे. कुमार गौरवची मुलगी आणि संजय दत्तची भाची साची हिच्याविषयीदेखील फारसे कोणाला माहीत नाही. 


कमाल अमरोहींच्या नातवासोबत झाले आहे साचीचे लग्न... 
-संजय दत्तची भाची साची कुमारचे लग्न 'पाकीजा' चित्रपटाचे दिग्दर्शक कमाल अमरोही यांचा नातू बिलालसोबत झाले आहे. कमाल अमरोही यांची दोन मुले आहेत. शानदार आणि ताजदार अमरोही ही त्यांची नावे आहेत. बिलाल हा ताजदार अमरोही यांचा मुलगा आहे. 
- राजेंद्र कुमार यांची नात साची नोव्हेंबर 2014 साली एका खासगी समारंभात बिलाल अमरोहीसोबत विवाहबद्ध झाली होती. त्यावेळी साचीचा मामा म्हणजेच संजय दत्त तुरुंगात होता. त्यामुळे लग्नसमारंभ अतिशय साधा ठेवण्यात आला होता.
- बिलालने 2014 मध्ये 'ओ तेरी' या चित्रपटात डेब्यू केले होते. याचकाळात त्याने साचीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुलीही दिली होती.


फॅशन डिझायनर आहे साची..
- साची कुमार फॅशन डिझायनर आहे. तिने 2006 साली एसएनडीटी युनिवर्सिटीमध्ये फॅशन डिप्लोमा केला. साचीने अन्ना सिंह यांच्याकडे इंटर्नशिपही केली आहे. 
- 2007 साली साचीने तिचे फॅशन लेबल लॉन्च केले. साचीने तिची मावशी प्रिया दत्त आणि संजय दत्तसाठीही ड्रेस डिझाईन केले आहेत.
 पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि भेटा, संजय दत्तच्या इतर फॅमिली मेंबर्सना...  

बातम्या आणखी आहेत...