आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे संजय दत्तचा रिअल बेस्ट फ्रेंड परेश, Sanju मध्ये विक्की कौशलने साकारला आहे हा रोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई: 'संजू' या चित्रपटातील अभिनेता रणबीर कपूरने साकारलेल्या भूमिकेचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. या चित्रपटात रणबीरचा बेस्ट फ्रेंड कमलेश कन्हैयालाल कापसी 'कमली'च्या भूमिकेत अभिनेता विक्की कौशल असून त्याच्याही भूमिकेची प्रशंसा होतेय. एका मुलाखतीत विक्कीने सांगितले होते, की  'ही भूमिका संजयच्या तीन-चार मित्रांचे एकत्रीकरण असले तरीदेखील ही भूमिका सर्वाधिक संजय दत्तचा जिगरी मित्र परेश घेलानीच्या जास्त जवळची आहे. परेश यूएसमध्ये राहतात.'

 

कोण आहेत परेश घेलानी?
परेश यांना संजय प्रेमाने 'पर्या'  म्हणून हाक मारतो. या दोघांची मैत्री संजय दत्तचा डेब्यू चित्रपट 'रॉकी'च्या रिलीजवेळी झाली होती. तेव्हापासून आजतागायत या दोघांनाही एकमेकांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. संजयच्या प्रत्येक कठीण काळात परेश त्याच्या पाठिशी कणखरपणे उभा राहिला आहे. सध्या परेश लॉस एंजिलिस येथे वास्तव्याला आहे. 

 

बिझनेसमन आहेत परेश
परेश एक बिझनेसमन आहेत. ते अशा लोकांपैकी एक आहेत, ज्यांना भारतात XPRIZE  आणण्याचे श्रेय दिले जाते.  XPRIZE एक नॉन प्रॉफिट ऑर्गेनाईजेशन आहे जी सार्वजनिक स्पर्धांचे आयोजन करते. या स्पर्धांमधून टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील टॅलेंट पुढे आणण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला वाव देण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय ते Moon Express, Viome Inc, DTV Motor Corporation, Ferrate Treatment Technologies, Casepoint, Radimmune Therapeutics या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदार आहेत.

 

परेश यांनी 2020 एलएलसी कंपनीचा पाय रोवला आहे. यामध्ये सुमारे 1000 लोक काम करतात. ही कंपनी अमेरिकन सरकारला शिक्षा, संरक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी प्रदान करण्याचे काम करते. परेश यांना लाइमलाइटमध्ये राहणे पसंत नाही. पण संजयच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर ते त्याच्या सोबत असतात.  

बातम्या आणखी आहेत...