आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत शशी कपूर यांची नातवंडे, लाइमलाइटपासून दूर राहतात हे फॅमिली Members

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलिया कपूर, शायरा कपूर, झेक कपूर, इनसेटमध्ये शशी कपूर - Divya Marathi
आलिया कपूर, शायरा कपूर, झेक कपूर, इनसेटमध्ये शशी कपूर

मुंबईः दिवंगत अभिनेते शशी कपूर आज (18 मार्च) हयात असते तर त्यांनी वयाची 80 वर्षे पूर्ण केली असती. 4 डिसेंबर 2017 रोजी वयाच्या 79 वर्षी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली होती. 18 मार्च 1938 रोजी कोलकाता येथे जन्मलेले शशी पृथ्वीराज कपूर यांचे धाकटे चिरंजीव आणि राज कपूर, शम्मी कपूर यांचे भाऊ होते. 1958 मध्ये परदेशी तरुणी जेनिफर कँडलसोबत शशी विवाहबद्ध झाले होते. या दाम्पत्याला कुणाल, करण आणि संजना कपूर ही तीन मुले आहेत.  


लाइमलाइटपासून दूर राहतात शशी कपूर यांची नातवंडे...
- शशी कपूर यांचा थोरला मुलगा कुणाल कपूरचे लग्न रमेश सिप्पी यांची कन्या शीना सिप्पी झाले होते. या दाम्पत्याला एका मुलगा आणि एक मुलगी आहे. शायरा लौरा कपूर हे त्यांच्या मुलीचे आणि जहान पृथ्वीराज कपूर हे मुलाचे नाव आहे. 
- कुणाल कपूर आणि शीना सिप्पी यांचा घटस्फोट झाला आहे. 
- शायरा आणि जहान हे दोघेही लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात.
- शशी कपूर यांचा दुसरा मुलगा कुणाल कपूरच्या पत्नीचे नाव लोरना आहे. या दाम्पत्यालासुद्धा एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
- झेक हे मुलाचे तर आलिया हे करण कपूरच्या मुलीचे नाव आहे. 
- करण कपूर पत्नी आणि मुलांसोबत यूएसमध्ये वास्तव्याला आहे.
- शशी कपूर यांची कन्या संजना कपूरचे लग्न वाल्मिक थापरसोबत झाले असून या दाम्पत्याला हमीर हा एक मुलगा आहे. 
- विशेष म्हणजे शशी कपूर यांची पाचही नातवंडे लाइमलाइटपासून दूर राहतात. फॅमिली पार्टीजमध्ये क्वचितच हे दिसतात.  


पुढील स्लाईड्सवर बघा, शशी कपूर यांच्या मुलांची आणि नातवंडांची छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...