आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Meet Sridevi Sister In Law: Sunita Kapoor Was Top Model But Left The Field After Marriage

आघाडीची मॉडेल होती श्रीदेवींची धाकटी जाऊ, लग्नापूर्वी उचलायची पती अनिल कपूरचा खर्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी चेन्नईत प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दाक्षिणात्य कलाकारांनी श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली. या प्रार्थना सभेला कपूर कुटुंबीय हजर होते. दरम्यान सोशल मीडियावर श्रीदेवी आणि त्यांच्या धाकट्या जाऊबाई सुनीता कपूर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत दोन्ही जावा पारंपरिक ड्रेसमध्ये दिसत आहेत. लाइमलाइटपासून कायम दूर राहणा-या सुनीता कपूर या अभिनेते अनिल कपूर यांच्या पत्नी आहेत. श्रीदेवी आणि बोनी यांच्याप्रमाणेच अनिल आणि सुनीता कपूर यांनीही प्रेमविवाह केल्याचे फार कमी जणांना ठाऊक असावे. दोघांची प्रेमकहाणी फिल्मी कथेला शोभेल अशी आहे. 


सुनीता आघाडीची मॉडेल असताना स्ट्रगलिंग अॅक्टर होते अनिल...
- जेव्हा दोघांची पहिली भेट झाली, तेव्हा अनिल कपूर एक स्ट्रगलिंग अभिनेते होते आणि सुनीता प्रसिध्द मॉडेल. अनिल सुनीता यांना पाहताच त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यांना सुनीताशी ओळख करायची होती, परंतु त्यांच्याकडे सुनीतापर्यंत जाण्याचा कोणताच मार्ग नव्हता. अखेर, त्यांच्या मित्रांनी त्यांना सुनीताचा नंबर दिला. त्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरु झाले. अनिल, सुनीता यांच्या आवाजाचे दीवाने झाले होते.
- एका मुलाखतीत अनिल यांनी सांगितले होते, ''एकेदिवशी धाडस करून मी सुनीतासमोर डेटवर जाण्याचा प्रस्ताव ठेवला. सुनीताने आनंदाने तो स्वीकारला. किती वेळात पोहोचणार असे सुनीताने मला विचारले. तेव्हा मी दोन तास लागणार असल्याचे सांगितले. एवढा वेळ का लागणार, असे सुनीताने विचारल्यानंतर मी बसने येणार असल्याचे तिला सांगितले. टॅक्सीने प्रवास करण्यासाठी माझ्याजवळ पैसे नाहीत, त्यामुळे मी बसने प्रवास करणार असल्याचे सुनीताला सांगितले होते." 
- त्यावर सुनीता अनिलला म्हणाल्या, "तुम्ही कॅबने या. मी येथे आल्यानंतर पैसे देईल." यानंतर हे दोघे भेटले आणि त्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी सैरसपाटा केला. सुनीता प्रसिद्ध मॉडेल असूनही त्या अनिल कपूरबरोबर बस-टॅक्सीमध्ये फिरल्या.  अनिल कपूर यांनीच सुनीताला लग्नाची मागणी घातली. 
- कालांतराने अनिल यांनासुध्दा सिनेमांमध्ये काम मिळू लागले होते. 1984 मध्ये आलेल्या 'मशाल' सिनेमातून त्यांना चांगली ओळख मिळाली. 19 मे 1984 ला दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.


पुढील स्लाईड्सवर बघा, थोरल्या जाऊबाई श्रीदेवी आणि पती अनिल कपूर यांच्यासोबतचे सुनीता यांचे फोटोज आणि वाचा आणखी काही इंट्रेस्टिंग किस्से.... 

बातम्या आणखी आहेत...